शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कामगार परतल्याने ‘रेमण्ड’चे काम सुरू

By admin | Updated: October 27, 2016 01:09 IST

कामगार कामावर परतल्याने मागील पाच दिवसांपासून ठप्प पडलेले लोहारा एमआयडीसीतील ‘रेमण्ड युको डेनिम’चे उत्पादन पूर्ववत सुरू झाले आहे.

तीन पाळीत काम : पाच दिवस ठप्प पडले होते उत्पादनयवतमाळ : कामगार कामावर परतल्याने मागील पाच दिवसांपासून ठप्प पडलेले लोहारा एमआयडीसीतील ‘रेमण्ड युको डेनिम’चे उत्पादन पूर्ववत सुरू झाले आहे. नेहमीप्रमाणे तीन पाळीत उत्पादनाची प्रक्रिया केली जात आहे. गेले पाच दिवस काही कामगारांनी नवीन वेतन कराराला विरोध दर्शवित काम बंद केले होते. कंपनीने अधिकृत कामगार संघटनेशी पुढील चार वर्षांसाठी केलेला नवीन वेतन करार या कामगारांना मान्य नव्हता. रेमण्ड कामगार संघाने वेतन कराराला विरोध दर्शवीत काम बंद आंदोलन सुरू केले होते. केवळ २0 टक्केच कामगार कामावर होते. त्यामुळे कंपनीचे उत्पादन ठप्प पडले होते. कंपनी प्रशासनाने काम बंद करणाऱ्या कामगारांशी बोलणी करण्यास नकार दर्शविला होता. यामुळे तिढा वाढला होता.नवीन वेतन करारावरूनच रेमण्ड कामगार संघाने कंपनीला काम बंद करण्याची कोटीस दिली होती. त्याविरूद्ध कंपनीने औद्योगिक न्यायालयात प्रकरण दाखल केले. त्यावर औद्योगिक न्यायालयाने मंगळवारी निर्णय देताना कामगारांना तत्काळ कामावर परतण्याचे आदेश दिले. त्याला अनुसरून बुधवारी कामगार कामावर परतले. आता तीन पाळीत कंपनीचे काम पुन्हा सुरू झाले आहे. कामगारांना पोलीस संरक्षण देण्यात आल्याचे रेमण्ड कामगार संघाचे अध्यक्ष योगेश जाधव यांनी सांगितले. भारतीय विश्वकर्मा मील मजदूर संघटनेचे अध्यक्ष वेदराज ऊर्फ विकास जोमदे यांनीही आजपासून कंपनीचे काम पूर्ववत सुरू झाल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)पहिली, दुसरी व सामान्य पाळी सुरळीतकाम बंद आंदोलनानंतर आज सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंतच्या पहिल्या पाळीत ४९२, सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंतच्या सामान्य पाळीत २३९, तर दुपारी ३ वाजतापासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या पाळीत ५0३ कामगार कामावर होते. या सर्व पाळ्यात सर्वच कामगार उपस्थित होते. कंपनीचे कामकाज आता पूर्ववत सुरळीत सुरू झाल्याचे मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख चंद्रशेखर पातुरकर यांनी सांगितले.