शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कृषी महाविद्यालय परत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:44 IST

यवतमाळात मंजूर झालेले परंतु नंतर मुख्यमंत्र्यांच्या गावी मूल जि. चंद्रपूर येथे पळविलेले शासकीय कृषी महाविद्यालय यवतमाळला परत देण्यात यावे, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार ख्वाजा बेग यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे शुक्रवारी केली.

ठळक मुद्देख्वाजा बेग यांची मागणी : विधान परिषदेत सरकारचे लक्ष वेधले, राष्ट्रवादी आग्रही

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : यवतमाळात मंजूर झालेले परंतु नंतर मुख्यमंत्र्यांच्या गावी मूल जि. चंद्रपूर येथे पळविलेले शासकीय कृषी महाविद्यालय यवतमाळला परत देण्यात यावे, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार ख्वाजा बेग यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे शुक्रवारी केली. याच मुद्यावर दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनीसुद्धा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, हे विशेष.शासनाने २०१६ मध्ये यवतमाळात शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी ६० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. मात्र अचानक हे मंजूर कृषी महाविद्यालय रद्द करण्याची घोषणा शासनाने केल्याने शेतकरीपुत्रांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने त्यावर आधारित शिक्षण घेण्याकडे कल वाढतो आहे. हे महाविद्यालय कायम ठेवल्यास शासकीय कोट्यातून शिक्षण पूर्ण करणे गोरगरीब शेतकऱ्यांच्या पाल्यांना शक्य होईल. अचानक महाविद्यालय रद्द करण्याचा निर्णय हा शेतकरी विरोधी व जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला खीळ घालणारा ठरला आहे. त्यामुळे यवतमाळला मंजूर झालेले शासकीय कृषी महाविद्यालय परत द्यावे, अशी जोरदार मागणी आमदार ख्वाजा बेग यांनी विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात केली. कृषी महाविद्यालय परत न मिळाल्यास शेतकरी व कृषी प्रवेशासाठी इच्छूक विद्यार्थ्यांना घेऊन मोठा लढा उभारावा लागेल, असा इशाराही आमदार बेग यांनी दिला.यवतमाळच्या शासकीय कृषी महाविद्यालयासाठी आमदार ख्वाजा बेग यांनी जिल्ह्यातून सर्वप्रथम आवाज उठविला होता, हे विशेष. हे महाविद्यालय रद्द करून आता अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयावर जिल्ह्याची बोळवण केली जात आहे. तेही दोन वर्षांनी प्रत्यक्ष सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

टॅग्स :Khwaja Baigख्वाजा बेग