शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

शिरपूरमध्ये विसर्जित रोपांचे पुन्हा रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:39 IST

बेजबाबदारपणामुळे सुकलेली रोपे तलावात फेकून दिल्याच्या घटनेचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच, शनिवारी शिरपूर ग्रामपंचायतने पुन्हा एक नवा प्रताप केला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश येताच, तलावात फेकलेली रोपे शनिवारी सकाळी पुन्हा उचलून गावात मिळेल त्या ठिकाणी त्याचे रोपण केले.

ठळक मुद्देबीडीओंकडून चौकशीचे आदेश : ग्रामपंचायतचा नवा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : बेजबाबदारपणामुळे सुकलेली रोपे तलावात फेकून दिल्याच्या घटनेचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच, शनिवारी शिरपूर ग्रामपंचायतने पुन्हा एक नवा प्रताप केला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश येताच, तलावात फेकलेली रोपे शनिवारी सकाळी पुन्हा उचलून गावात मिळेल त्या ठिकाणी त्याचे रोपण केले. या प्रकरणात चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश गायनर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, गटविकास अधिकारी राजेश गायनर व महसूल विभागाचे काही अधिकारी महत्त्वाच्या बैठकीसाठी शिरपूरमध्ये येणार असल्याची कुणकुण लागताच, शिरपूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ६ नोव्हेंबरच्या भल्या पहाटे ग्रामपंचायतीच्या खोलीत सुकलेल्या अवस्थेत ठेऊन असलेली ३०० पेक्षा अधिक रोपे गावालगतच्या तलावात नेऊन फेकली. काही जागरूक नागरिकांना हा संतापजनक प्रकार कळल्यानंतर त्यांनी हा सारा घटनाक्रम आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. शनिवारी यासंदर्भात ‘लोकमत’ने ठळक वृत्त प्रकाशित करताच, शिरपूर ग्रामपंचायतीचे प्रशासन हादरून गेले. कारवाईच्या भीतीने ६ नोव्हेंबरला तलावात फेकून देण्यात आलेली ही रोपे शनिवारी सकाळी तेथून पुन्हा उचलून त्याचे शिरपूर परिसरात मिळेल त्या जागी घाईगडबडीने रोपण करण्यात आले. हा प्रकारदेखिल जागरूक नागरिकांनी आपल्या कॅमेºयात कैद केला. या ग्रामपंचायतीला एक हजार रोपे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. परंतु याविषयात कायम अनास्था असलेल्या शिरपूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे नाचवत वृक्षारोपण केल्याचे दाखविले. प्रत्यक्षात या रोपांची काय स्थिती आहे, याची खबरबातदेखिल या पदाधिकाºयांना नाही. शुक्रवारी या विषयात ‘लोकमत’ने सरपंच मिनाक्षी कनाके यांना विचारणा केली असता, केवळ आकड्यांची गणिते सांगून त्यांनी स्वत:च्या बेजबाबदारपणाचे प्रदर्शन केले. शासनाकडून आलेल्या योजना ग्रामपंचायतींकडून किती प्रामाणिकपणे राबविल्या जातात, याचा प्रत्यय या घटनेने आला.विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविली चौकशीशनिवारी ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच, वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश गायनर यांनी विस्तार अधिकारी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाला यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारपासून या प्रकरणाच्या चौकशीला प्रारंभ होणार असून त्याचा अहवाल तीन दिवसांच्या आत सादर करावयाचा आहे.शिरपूर ग्रामपंचायतीने केलेला हा प्रकार अतिशय गंभीर असून त्याची चौकशी केली जात आहे. या चौकशीत जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई करण्याची शिफारस वरिष्ठांकडे केली जाईल.- राजेश गायनर,गटविकास अधिकारी वणी.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत