शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

पुसद हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प

By admin | Updated: December 23, 2016 02:26 IST

आजही पुसद तालुक्यातच नव्हेतर शहरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर शौचास बसणारे आहेत.

दोन गुड मॉर्निंग पथक : शहरात १३०० घरांमध्ये शौचालय नाही पुसद : आजही पुसद तालुक्यातच नव्हेतर शहरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर शौचास बसणारे आहेत. या बाबीचे दुष्परिणाम लक्षात घेता आता पुसद शहर संपूर्ण हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार नगरपरिषदेने कलो आहे. त्या अनुषंगाने उघड्यावर प्रात:विधीस जाणाऱ्या लोकांचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये १३०० घरांमध्ये शौचालयच नसल्याचे उघडकीस आले. या सर्वांना नगरपरिषदेमार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. नगरपरिषदेत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय वाटप कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी शौचालयाचा फॉर्म व त्याबाबतची माहिती नागरिकांना मिळणार आहे. नगरपरिषदेकडून वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदान घेवून बांधकाम न करणाऱ्या उघड्यावर प्रात:विधीस जाणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी दिली. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी घाण पसरविणाऱ्यांविरुद्ध आता पुसद नगरपरिषदेने मोहीम हाती घेतली आहे. १९ डिसेंबरपासून या मोहिमेला प्रारंभ झाला आहे. यासाठी दोन गुड मॉर्निंग पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाने गेल्या चार दिवसात अनेकांना गांधीगिरीच्या माध्यमातून घरी शौचालय बांधण्याबाबत विनंती केली आहे. तसेच शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पालिकेच्यावतीने कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. हे गुड मॉर्निंग पथक दररोज सकाळ व संध्याकाळी विविध भागात फिरून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना समज देण्यात येत आहे. पुसद शहरात एकूण २८०० घरी शौचालय नाही. त्यापैकी १६०० कुटुंबियांना शौचालय बांधकामासाठी मंजुरात देण्यात आली आणि ९०० जणांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्यामुळे आता जवळपास १३०० घरांसाठी नव्याने अनुदान देण्यात येणार आहे. शौचालयाचे बांधकाम न करणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रथम समज दिल्यानंतरही कोणी उघड्यावर शौचास बसताना दिसल्यास कायदेशीर कारवाईला त्याला सामोरे जावे लागेल. यासाठी गुड मॉर्निंग पथक कार्यरत आहे. नगरपरिषदेकडून शौचालय बांधण्यासाठी अनुदान घेवूनही ज्यांनी बांधकामच केले नाही अशांचाही तपास सुरू असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी) कलापथकाद्वारे केली जात आहे जनजागृती शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कलापथकाद्वारा जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये सात कलावंतांचा समावेश आहे. यासोबतच घरोघरी जावून स्वच्छता अभियानाबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. नागरिकांनी पूस नदी परिसरात शौचास जावू नये, यासाठी तेथील झुडुंपांचीही साफसफाई करण्यात येणार आहे. शहरात एकूण २४ सार्वजनिक शौचालय आहेत. त्यांचा वापर सर्व नागरिकांनी करावा, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी केले आहे.