शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

महागावात राजीनामा नाट्याने मानापमान

By admin | Updated: May 21, 2017 00:34 IST

येथील नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती अरुणा विष्णू चवरे यांनी तडकाफडकी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सोपविला.

पाणीपुरवठा सभापती : विरोधक म्हणतात, नागरिकांची दिशाभूल लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : येथील नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती अरुणा विष्णू चवरे यांनी तडकाफडकी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सोपविला. मात्र ही नाट्यमय घडामोड म्हणजे महागावकरांची दिशाभूल असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती अरुणा चवरे यांनी शुक्रवारी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तसेच विश्वासात घेत नसल्याचा ठपका ठेऊन सभापती पदाचा राजीनामा दिला. परिवर्तन विकास आघाडीचे नगरपंचायतीत बहुमत असतानाही त्यांच्या सदस्यांमध्ये एकमत नसल्याने हे राजीनामा नाट्य घडल्याची चर्चा आहे. नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरात १७ बोअर मंजूर आहे. मात्र अद्याप काम सुरू झाले नाही. याचे नेमके कारण काय हेसुद्धा नागरिकांना कळले नाही. गेल्या वर्षी पाणी समस्येबाबत गटनेता शैलेष कोपरकर यांच्या नेतृत्वात घागर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचीसुद्धा नगरपंचायतीने दखल घेतली नाही. अखेर लोकवर्गणीतून प्रभाग क्र. १० मध्ये बोअर खोदण्यात आली. मात्र सदर बोअर अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन बंद करण्यात आल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. विद्यमान पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा हा नाट्यमय घडामोडींचा व महागावकरांची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप विरोधी पक्ष गटनेता शैलेष कोपरकर यांनी केला. यापूर्वीच्या पाणीपुरवठा सभापती छाया वाघमारे यांनीही राजीनामा दिला होता. तो नामंजूर करण्यात आला होता. आताही तिच स्थिती उद्भवण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. विकासात्मक कामांसाठी सत्ताधाऱ्यांकडे वेळ नसल्याचा आरोपही कोपरकर यांनी केला. नियोजनच नाही काँग्रेस शहराध्यक्ष आरिफ सुरैया यांनी सत्ताधारी व प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप केला. कार्यालयाच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असून पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. १४ व्या वित्त आयोगातून ७६ लाखांचा निधी मिळाला होता. तोसुद्धा नगरपंचायत खर्च करू शकली नाही. आता सभापतींनी राजीनामा दिल्याने पाणीटंचाई कशी निकाली काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.