शहरं
Join us  
Trending Stories
1
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
2
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
3
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
4
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
5
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
6
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
7
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
8
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
9
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
10
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
11
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
12
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
13
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
14
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
15
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
16
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
17
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
18
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
19
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!

पोलीस पाटलांचे आरक्षण

By admin | Updated: September 11, 2015 02:56 IST

वणी व मारेगाव तालुक्यात पोलीस पाटीलांची ३९ पदे रिक्त आहे. या पदांसाठी सोमवारी येथील महसूल भवनात आरक्षण जाहीर करण्यात आले.

३९ पदे : वणी, मारेगाव तालुक्यातील रिक्त जागा भरणारवणी : वणी व मारेगाव तालुक्यात पोलीस पाटीलांची ३९ पदे रिक्त आहे. या पदांसाठी सोमवारी येथील महसूल भवनात आरक्षण जाहीर करण्यात आले.वणी तालुक्यातील राजूर, पुरड (नेरड), लालगुडा व मारेगाव तालुक्यातील मार्डी व कोसारा येथील पोलीस पाटील पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. कोलगाव (सा.) व पळसोनी येथील पद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. वणी तालुक्यातील शिरगिरी, दहेगाव (डो.), पोहणा, शेवाळा, डोंगरगाव व मारेगाव तालुक्यातील पांडविहिर, कान्हाळगाव (वाई), खंडणी, सराटी व खैरगाव येथील पाटीलकी अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. कान्हाळगाव, कळमना (खु.), बोरी (खु.), हिवरधरा व खैरगाव (भेदी) येथील पद अनुसूचित जमाती प्रवर्गात्ील महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. कायर येथील पोलीस पाटील पद विशेष मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. वणी तालुक्यातील नायगाव (बु.), कळमना (बु.), मारेगाव (को.) येथील पद विमुक्त जाती (अ) प्रवर्गासाठी राखीव आहे, तर रासा व मोहोर्ली येथील पद विमुक्त जाती (अ) महिलांसाठी राखीव आहे. गोपालपूर (खा.) येथील पद भटक्या जाती (क) प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. वणी तालुक्यातील निळापूर येथील पद भटक्या जाती (ड) प्रवर्गासाठी, तर चिखलगाव येथील पद भटक्या जाती (ड) प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. वणी तालुक्यातील पठारपूर व मुंगोली, मारेगाव तालुक्यातील पार्डी (मार्डी), दांडगाव, वनोजा (देवी), गोरज, मुक्टा येथील पाटीलकी इतर मागास वर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. डोंगरगाव, शेलू (खु.) व मानकी येथील पद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. वणी तालुक्यातील नांदेपेरा, पुनवट, उकणी, मंदर, येनक, खांदला, नवेगाव, ढाकोरी, शिवणी (ज.), पिंपरी (को.) व मारेगाव तालुक्यातील हटवांजरी, डोलडोंगरगाव, पांढरकवडा, पाथरी येथील पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. सावंगी, विरकुंड (विठ्ठलनगर), कोरंबी, घोडदरा व अहेरी येथील पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले. आरक्षण ऐकण्यासाठी वणी व मारेगाव तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा, तहसीलदार रणजित भोसले, शिरस्तेदार विवेक पांडे, लिपीक जितू पाटील यांनी आरक्षण जाहीर केले. (कार्यालय प्रतिनिधी)