शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण, आमचा घटनादत्त अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 22:47 IST

आरक्षण ही काही भीक नाही, तो आमचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनादत्त अधिकार आहे. तो आम्ही घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

ठळक मुद्देप्रवीण देशमुख : मराठा सेवा संघाच्या संयोजनात आझाद मैदानात व्याख्यान

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : आरक्षण ही काही भीक नाही, तो आमचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनादत्त अधिकार आहे. तो आम्ही घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ओबीसींची संख्या ५२ टक्केच्यावर असूनही आरक्षण २७ टक्के आहे, हे सांगून ओबीसींनाच अटी व शर्ती का, विद्यार्थ्यांना अर्धी शिष्यवृत्ती का, त्याने सरकारी नोकरी करायचीच नाही काय, ओबीसी-कुणबी, शेतकºयांचा मुलगा शिकेल कसा, अशा विविध प्रश्नांची उकल व्याख्याते प्रवीण देशमुख यांनी केले.येथील आझाद मेदानात आयोजित स्मृती पर्वात मराठा सेवा संघाच्यावतीने आयोजित ‘स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही आरक्षणाची गरज का?’ या विषयावर त्यांनी विचार मांडले.प्रवीण देशमुख म्हणाले, ओबीसी कुणबी हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असायचा. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकºयांची पार वाट लावली आहे, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. विदर्भात विशेषत: यवतमाळात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत आहेत. तो कधी कर्जबाजारीपणा, नापिकी, विषबाधा, शेतमालाला मिळणारा अल्प दर इत्यादी कारणांमुळे दररोज मरतो आहे. तरीदेखील कुणीच त्याच्या पाठिशी उभे राहायला तयार नाही. शेतकºयाला एकाकी पाडले जात आहे. शेती व्यवसायात त्यांचे जीवन सुरक्षित नाही याची जाणीव शेतकºयाला आता होऊ लागली आहे. म्हणूनच माँ जिजाऊ व शिवबांचा अनुयायी आता आपले हक्क व अधिकाराची लढाई लढायला तयार झाला आहे, असे ते म्हणाले. मंडल आयोग, ओबीसी जनगणना, पदोन्नतीतील आरक्षण, ओबीसीचे क्रिमिलीअर, फोफावणारा मनुवाद, अदृश अणीबाणी आदी विषयांचा परामर्श त्यांनी घेतला.यावेळी अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले होते. प्रारंभी प्राजक्ता मुनेश्वर, सरिता देशमुख, यश चव्हाण, मोहित गोळे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, पप्पू पाटील भोयर, डॉ. छाया महाले, वैशाली सवाई, उषा दिवटे, विजय खडसे, अरुण राऊत, प्रदीप वादाफळे, जिनेंद्र ब्राह्मणकर, योगेश धानोरकर, नंदू बुटे, विशाल चुटे, प्रवीण भोयर, योगिराज अरसोड, रमेश होनाडे, महेंद्र वेळूकार, पीयूष चव्हाण, कल्पना कोरडे, सतीश डोळे, प्रा.डॉ. अशोक राणा आदी मंचावर उपस्थित होते. स्मृती पर्वाचे समन्वयक ज्ञानेश्वर गोरे, कवडु नगराळे, सुनीता काळे, माया गोरे, प्रा. सविता हजारे, लक्ष्मीकांत लोळगे, आनंद गायकवाड, सुनील वासनिक, संजय बोरकर आदींची उपस्थिती होती.