शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

वृद्ध व निराधारांचा आक्रोश

By admin | Updated: March 25, 2015 00:01 IST

तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विविध योजनानिहाय लाभ घेणाऱ्या अनेक निराधारांना गेल्या तीन महिन्यांपासून अनुदानच मिळाले नाही.

मारेगाव : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विविध योजनानिहाय लाभ घेणाऱ्या अनेक निराधारांना गेल्या तीन महिन्यांपासून अनुदानच मिळाले नाही. अनुदान न मिळाल्याने निराधारांमध्ये प्रचंड आक्रोष सुरू झाला आहे.विविध निराधार योजनांचे लाभार्थी नियमित संबंधित बँकेत जाऊन ‘आमचा पगार आला काजी साहेब’, अशी विचारणा करीत आहे. नुकतेच जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्याचे अनुदान बँकांना पाठविण्यात आले. मात्र त्यात अनेकांची नावे नाहीत. १५ ते २० वर्षांपासून नियमित लाभ घेणाऱ्या निराधारांचे अनुदान अचानक बंद झाल्याने वृद्ध निराधार चांगलेच धास्तावले आहे. यातील काही मरनासन्न अवस्थेत, तर काही अपंग आहे. काहींना धड चालता येत नाही, अशी या निराधारांची अवस्था आहे. तहसीलमधील संजय गांधी योजना सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विविध योजनाअंतर्गत अनुदान घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी करण्यात आली आहे. त्यात ज्यांचे अर्ज मिळाले नाही, त्याचे अनुदान तात्पुरते थांबविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. गेल्या २० ते २५ वर्षांपासून काही लाभार्थी सदर मदत घेत आहे. अनुदान मंजूर करताना त्या लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. त्या अर्जाला समितीने मंजुरी दिल्यानंतरच लाभार्थ्यांना प्रथम मनिआॅर्डरने व नंतर २००१ पासून बँकेमार्फत अनुदान मिळत आहे. लाभधारकांचे अर्ज, समितीचे प्रोसिडींग सांभाळून ठेवणे संबंधित संजय गांधी निराधार योजनेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम होते. मात्र अचानक लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज गहाळे होणे, सोबतच प्रोसेडिंग गहाळ होणे, अशा गोष्टी घडल्या आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची बेपर्वा वृत्ती समोर आली. त्याचा नाहक त्रास मात्र निराधारांना होत आहे. आता लाभार्थ्यांचे अर्ज नाही म्हणून, त्यांचे अनुदान थांबविणे बरोबर आहे काय ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लाभार्थ्यांकडून आता नव्याने अर्ज भरून घेतले जाणार आहे. याचाच अर्थ लाभार्थ्यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास होणार आहे. त्यांना तोपर्यंत अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत त्यांनी उपजिवीका कशी करावी, असा प्रश्न आहे. तहसीलने आपली कागदी कारवाई करावी, मात्र नियमित लाभाधारकाचे अनुदान बंद करू नये, अशी लाभार्थ्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)माहिती देण्यास टाळाटाळनिराधारांचे अनुदान थांबविण्याची कारणे देण्याची माहिती अधिकारात जनमाहिती अधिकाऱ्यांकडे माहिती मागण्यात आली. मात्र जनमाहिती अधिकाऱ्यांनी संबंधित अव्वल कारकुणाशी संपर्क साधावा, असे सूचवून आपली जबाबदारी झटकली. संबंधितांना अद्याप ही माहिती दिली नाही. एकाचवेळी संजय गांधी, श्रावण बाळ अशा अनेक योजनांच्या किमान ६०० ते ७०० निराधारांचे अनुदान थकले आहे. त्यामुळे निराधारांवर अन्याय होत आहे. तशी त्यांची भावना झाली आहे. लोकप्रतिनिधी मात्र अद्याप मूग मिळून बसले आहे. कार्यालयातून अर्ज गहाळ झाल्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याची मागणी होत आहे.