शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आनंदनगरातील अडकलेल्या नागरिकांचे बचावकार्य सुरू; हेलिकाॅप्टरला योग्य जागा मिळेना  

By विशाल सोनटक्के | Updated: July 22, 2023 18:25 IST

गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील आनंदनगर या छोट्याशा खेड्यातील ४५ नागरिक पूस नदीच्या पुरात अडकून पडले.

महागाव (यवतमाळ) : गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील आनंदनगर या छोट्याशा खेड्यातील ४५ नागरिक पूस नदीच्या पुरात अडकून पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी छत्तीसगडवरून हेलिकाॅप्टर मागविण्यात आले. मात्र हेलिकाॅप्टर उतरविण्यासाठी ऐनवेळी योग्य जागाच मिळाली नाही. त्यामुळे हेलिकाॅप्टर खडका गावात उतरविण्यात आले. तर आनंदनगरातील नागरिकांना ऐनवेळी बोटीद्वारे बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील अनंतवाडी गटग्रामपंचायतीमधील आनंदनगर ही छोटीशी वस्ती पूस नदीच्या विस्तीर्ण पात्रातील एका छोट्या टेकडीवर वसली आहे. तेथील नागरिकांना नदीपात्रातूनच येण्याजाण्याचा मार्ग शोधावा लागतो. परंतु सध्या सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे या वस्तीला भयंकर पुराचा वेढा पडल्याने सर्व नागरिक अडकून पडले आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच त्यांनी मदतीची याचना सुरू केली. जिल्हा प्रशासनाने या नागरिकांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी थेट छत्तीसगडवरून हेलिकाॅप्टर मागविले. शनिवारी दुपारी साधारण ४.३० वाजताच्या सुमारास हेलिकाॅप्टर महागाव तालुक्यात दाखल झाले.

 परंतु तालुक्यात कुठेच हेलिपॅड नसल्यामुळे लॅन्डींगचा प्रश्न निर्माण झाला. शिवाय हेलिकाॅप्टरला उतरविण्यासाठी अनंतवाडीनजीक जागाच नव्हती. त्यामुळे हेलिकाॅप्टर खडका गावात उतरविण्यात आले. यादरम्यानच्या काळात आनंदनगरातील नागरिकांना बचाव पथकाने बोटीद्वारे नदीकाठावर आणणे सुरू केले. त्याचवेळी हेलिकाॅप्टरही नदीपात्राच्या जवळपास पोहोचले. आता बोट आणि हेलिकाॅप्टर अशा दोन्ही माध्यमातून नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. 

टॅग्स :YavatmalयवतमाळRainपाऊस