दारव्हा : तालुक्यातील पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी आपआपल्या गावात विजय मिळवून आपली पत ंराखली. सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक अद्याप व्हायची आहे. परंतु निवडून आलेल्या सदस्य संख्येवरून अनेक ठिकाणी चित्र स्पष्ट झाले आहे.पहिल्या टप्प्यात ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. सर्वच गावात निवडणूक अटीतटीची झाली. तरी राजकीय नेत्यांच्या गावात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मोठी ग्रामपंचायत असलेल्या तळेगाव येथे शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य संगीता इंगोले, माजी पंचायत समिती सदस्य माधव राठोड, सिंधू राठोड आदींनी बाजी मारली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, पंचायत समिती सदस्य माणिक राठोड यांचे गाव असलेल्या फुबगाव येथे शिवसेनेने यश प्राप्त केले.युवा सेनेचे तालुका प्रमुख शैलेश डहाके यांनी चिखली येथे स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांच्या मदतीने गावात आपले वर्चस्व निर्माण केले. त्याच बरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवसेनेचे अजय गाडगे यांनी सांगवी ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा बऱ्यापैकी यश संपादन केले आहे. आपसी मतभेद असतानासुद्धा परिस्थिती ओळखून या पक्षाच्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी एकत्र येवून अनेक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या.भांडेगाव येथे उत्तमराव गोमासे, रमेश वानखडे, बाबूसेठ इसाणी, सुनील तडके, जगदीश अघम आदींनी पुढाकार घेवून विजयश्री मिळविला. पाथ्रडदेवी येथील निवडणुकीत लंकेश्वर जाधव, लिंबासिंग पवार यांनी संयुक्तरित्या विजय प्राप्त केला. हातगावात या दोन्ही पक्षाने एकत्र येवून निवडणूक जिंकली. या ठिकाणी डी.डी. गिरी, किशोर चारोळे यांनी नेतृत्व केले. देऊळगाव (वळसा) येथील निवडणुकीत राजकुामर राठोड, धीरज राठोड यांनी स्थानिकांच्या मदतीने आपला झेंडा फडकाविला. तरी काही ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र लढत पक्षाला विजय मिळवून दिला. हरू येथील निवडणुकीत किशोर नरवडे, निरज नरवडे यांनी विरोधकांना धूळ चारली. कारजगाव येथे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ जाधव, लक्ष्मण चव्हाण यांनी पक्षाचा झेंडा फडकाविला. दूधगाव येथे मुस्ताक पटेल यांनी पॅनल निवडून आणले. त्याचप्रमाणे नायगावात काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शेलकर, नाना पाटील यांनी विजय मिळविला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी या निवडणुकीत बाजी मारून आपली प्रतिष्ठा राखली. मोठमोठ्या पक्षांनी किमान गावात तरी आपली प्रतिष्ठा राखल्याने त्यांच्या पक्षाकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी निवडणुकीत मोठ्या नेत्यांचाही सहभाग चर्चेचा ठरला. (तालुका प्रतिनिधी)
निवडणुकीत नेत्यांनी राखली गावात प्रतिष्ठा
By admin | Updated: May 6, 2015 01:59 IST