शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांची माहिती द्या...खाकी आपलीच आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:50 IST

चोरी, मारामारी, दरोडे आणि खून... अशा घटनांनी शहर सध्या मानसिक भूकंपाचे धक्के अनुभवत आहे. स्लम असो की उच्चभ्रू वस्ती, उघड-उघड गुन्हे घडत आहेत.

ठळक मुद्देयवतमाळकरांना आवाहन : चौकाचौकात पोलिसांचे होर्डिंग, संपर्क क्रमांक

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : चोरी, मारामारी, दरोडे आणि खून... अशा घटनांनी शहर सध्या मानसिक भूकंपाचे धक्के अनुभवत आहे. स्लम असो की उच्चभ्रू वस्ती, उघड-उघड गुन्हे घडत आहेत. लोक डोळ्यादेखत गुन्हे पाहूनही गप्प बसतात. अशावेळी ‘पोलीस आपल्या’ रक्षणासाठी आहेत, ही भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचे प्रयत्न जिल्हा पोलीस दलाने सुरू केले आहे. त्यासाठी चौका चौकात थेट पोलीस ठाण्यांचे संपर्क क्रमांक लावण्यात आले आहेत.यवतमाळात टोळी युद्धाचे फटके सामान्य माणसांना बसत आहेत. कोणता माणूस कोणत्या टोळीचा सदस्य आहे, हेही सर्वसामान्यांना माहिती नाही. भरचौकात साधा गाडीचा धक्का लागला तरी चाकू दाखविण्यापर्यंत वाद होत आहेत. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने संवेदनशील चौकांमध्ये शिपाई उभे करून ठेवले आहेत. पण जोपर्यंत पोलिसांना सामान्य नागरिकांची मदत मिळत नाही, तोपर्यंत शहरात लपून बसलेल्या गुन्हेगारांवर वचक ठेवणे अशक्य आहे.म्हणूनच पोलीस आपले आहेत, ही भावना नागरिकांच्या मनात निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा पोलीस दलाने ‘आपली खाकी’ असे मोठ मोठे बॅनर तयार करून शहरात सर्वत्र लावले आहेत. एखाद्या कुटुुंबाला पूर्ण संरक्षण देणारे पोलीस, असे मार्मिक चित्र या बॅनरवर दिसते. तर सोबतच शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे संपर्क क्रमांकही त्यावर छापण्यात आले आहे. आपल्या परिसरात कुठेही गुन्हेगारी स्वरुपाची घटना घडत असेल, गुन्हेगारांचा वावर आढळत असेल, तर नागरिकांनी लगेच पोलिसांशी संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन या बॅनरमधून करण्यात आले आहे. अण्णा भाऊ साठे चौक, सम्यक क्रांती चौक, शाहू पहेलवान चौक, महात्मा फुले चौक, नालंदा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर आदी परिसरात ‘आपली खाकी’चे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.पोलीस आणि नागरिकांत आपलेपणा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सर्वच भागात हे फलक लावले आहेत. त्याचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. ज्या भागातून पोलिसांपर्यंत माहिती यायला वेळ लागतो, त्या भागावर विशेष भर दिला जात आहे.- एम. राज कुमार,जिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :Policeपोलिस