बिरसा ब्रिगेड : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना साकडेयवतमाळ : बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जमातीचे बोगस जात प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी बिरसा ब्रिगेडने केली आहे. बिरसा ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे निवेदन पाठविले आहे. खोट्या कागदपत्रांद्वारे आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र काढल्याचे प्रकरण किनवट उपविभागीय कार्यालय आणि अनुसूचित जाती-जमाती पडताळणी समिती औरंगाबाद यांच्या निदर्शनास नुकतेच आले आहे. त्यांनी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून तपासणी सुरू आहे. बोगस जात प्रमाणपत्र काढणारे मोठे रॅकेट नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात असल्याची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुडमेथे, गणेश आत्राम, नीलेश पंधरे, सचिन मालगडे, राहुल मेश्राम, देवानंद तायवाडे, पवन पोटफाडे, नंदकिशोर आगले, प्रवीण मडावी, कामेश अगलधरे, गीत घोष, अजिंक्य कोवे, अमोल मडावी, सुनील ढाले, प्रफुल्ल गेडाम, मंगेश शेंडे, मोहन अरके, सुरज मसराम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
बोगस प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा
By admin | Updated: February 27, 2016 02:58 IST