शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ: पुनर्रोपण केलेल्या झाडांपैकी फक्त एकाच झाडाला पालवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 14:16 IST

धामणगाव मार्ग रुंदीकरणात तोडली होती शेकडो वृक्ष 

यवतमाळ : धामणगाव मार्गाच्या रुंदीकरणात तोडलेल्या शेकडो झाडांपैकी १७ झाडांचे जांब फॉरेस्ट पार्कमध्ये पुनर्रोपण करण्यात आले. मात्र त्यापैकी केवळ एकाच झाडाला पालवी फुटली आहे. त्यामुळे पुनर्रोपणासाठी झालेला खर्च वाया गेला आहे. यवतमाळ शहरात सध्या मोठ्या  प्रमाणात रस्ता निर्मितीचं काम सुरू आहे. यवतमाळ-धामणगाव मार्गाचे रुंदीकरणही होत आहे. या मार्गावर ब्रिटिश काळापासून गर्द सावली देणारी कडूलिंबाची शेकडो झाडे आहेत. या झाडांमुळे स्टेट बँक चौकापासून मोहा फाट्यापर्यंत गर्द सावली होती. परंतु रस्त्याच्या रुंदीकरणात या झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली. पर्यावरणाचा प्रश्न पुढे आल्यानं वृक्षांचं पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर झाडांना मुळासह उखडून त्यांचं जांब मार्गावरील फॉरेस्ट पार्कमध्ये पुनर्रोपण करण्यात आलं. फॉरेस्ट पार्कमध्ये शेकडो वृक्षांचं पुनर्रोपण केलं जाणार होतं. मात्र शेकडो वृक्षांपैकी केवळ १७ वृक्ष जांबच्या फॉरेस्ट पार्कमध्ये पोहोचले. या ठिकाणी पुनर्रोपण करण्यात आलं. विशाल वृक्ष पुन्हा लावताना त्यांची योग्य काळजी घेणं गरजेचे होतं. मात्र या सर्व बाबींना फाटा देण्यात आला. मोठमोठे खड्डे करून त्यात वृक्ष लावण्यात आले. या १७ वृक्षांपैकी आता केवळ एकाच वृक्षाला पालवी फुटली. इतर वृक्ष आहे त्या स्थितीतच आहे. तर दुसरीकडे धामणगाव मार्गावर प्रचंड वृक्षतोड झाल्यानं परिसर ओसाड झाला आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ