लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव कसबा : दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत परिसर व आठवडीबाजार परिसरात बुलडोजर फिरवून अतिक्रमण हटविले.गेल्या काही वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्यामुळे अतिक्रमण काढण्याची नागरिकांची मागणी होती. याबाबत ग्रामसभेत ठराव पारित झाला होता. अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस दिल्यानंतर ४४ लोकांनी स्वत:हून अतिक्रमण काढले. उर्वरित अतिक्रमणावर मात्र पोलीस बंदोबस्तात बुलडोजर चालविण्यात आला. गावाच्या विकासासाठी हे अतिक्रमण काढण्यात आल्याची प्रतिक्रिया उपसरपंच धर्मेंद्र दुधे यांनी लोकमतला दिली.यावेळी ठाणेदार नरेश रणधीर, एपीआय मडावी, जमादार वाटमोडे, पोलीस कर्मचारी तसेच बालाजी राठोड, हारुण बेग, अब्दुल गफ्फार अब्दुल रज्जाक, दीपक लाड, तलाठी फुसनाके, ग्रामसेवक राठोड, व नागरिक उपस्थित होते.
महागाव (क.) येथे अतिक्रमण हटाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:13 IST
लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव कसबा : दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत परिसर व आठवडीबाजार परिसरात बुलडोजर फिरवून अतिक्रमण हटविले.गेल्या काही वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्यामुळे अतिक्रमण काढण्याची नागरिकांची मागणी होती. याबाबत ग्रामसभेत ठराव पारित झाला होता. अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस दिल्यानंतर ४४ लोकांनी स्वत:हून अतिक्रमण काढले. ...
महागाव (क.) येथे अतिक्रमण हटाव
ठळक मुद्देदारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत परिसर व आठवडीबाजार परिसरात बुलडोजर फिरवून अतिक्रमण हटविले.