शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित धारकान्हा विकासापासून कोसो दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:54 IST

तालुक्यातील धारकान्हा गाव गत ३६ वर्षांपासून विविध समस्यांच्या चक्रव्यूहात सापडले आहे.

नागरिकांचे निवेदन : गावकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष विश्वनाथ महामुने । लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : तालुक्यातील धारकान्हा गाव गत ३६ वर्षांपासून विविध समस्यांच्या चक्रव्यूहात सापडले आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने येथे वीज, रस्ता, पाणी, आरोग्य आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. धारकान्हा हे पुनर्वसित गाव आहे. १९८१ साली गावाचे पुनर्वसन झाले. तेव्हापासून गावात कोणत्याही सुविधा निर्माण केल्या नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. सर्वत्र चिखल पसरला आहे. त्यातच वीजपुरवठा नसल्याने अंधाराचे साम्राज्य असते. सरपटणारे विषारी प्राणी दिवसा आणि रात्रीही दिसतात. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी कुणीही गावाबाहेर पडण्याची हिमत करीत नाही. गावात जीवनावश्यक वस्त धान्य दुकान आणि रॉकेल विक्रेता नाही. दुसऱ्या गावात जावून रॉकेल आणावे लागते. पिण्याच्या पाण्याची सोय नसून नागरिकांना अशुद्ध पाण्यावर तहान भागवावी लागते. रस्त्याचा प्रश्न एवढा बिकट आहे की, दिवसाही जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. गावचा परिसर पुसद बाजारपेठेशी जोडला आहे. रुग्णांना रात्री-अपरात्री नेणे त्रासाचे होत आहे. समस्यांबाबत गावकऱ्यांनी वेळोवेळी निवेदने दिली. परंतु कुणीही दखल घेतली नाही. गावकरी धडकले तहसीलवर गत ३६ वर्षांपासून विकास म्हणजे काय असते, याचे दर्शन न झालेल्या धारकान्हाच्या नागरिकांनी महागाव तहसीलवर धडक दिली. गावातील समस्यांचा पाढा वाचून निवेदन दिले. यावेळी यादव मोरे, पंजाब गादेकर, बाजीराव ढोले, किसन उघडे, शालिग्राम मोरे, वाघाजी इंगळे, गजानन डोंगरे, तानाजी खरात, अंबादास पारस्कर, निसार बेग, सुभाष ढगे, माधव कांबळे, संजय उघडे, रमेश कांबळे, सुरेश जोगदंडे, गजानन कांबळे, लक्ष्मण देवारे, दत्ता भडंगे, अंबादास उघडे, सुभाष मदने, अशोक ढोले, शिवाजी खरात, नामदेव जोगदंडे, संघशील जोगदंडे, राहूल कांबळे, खंडू कांबळे, सीताराम भालेराव, दीपक भालेराव, संजय भिसे, दादाराव मोरे आदी उपस्थित होते.