शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक वाघिणीची पुन्हा हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 22:56 IST

अकरा जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीने पुन्हा एकदा वन विभागाच्या पथकांना हुलकावणी दिली. सायखेडा जंगलातील दरीत या नरभक्षक वाघिणीचे ‘लास्ट लोकेशन’ मिळाले असून सखी जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ठळक मुद्देवन विभागाच्या कॅमेरात कैद : सायखेडा जंगलातील दरीत लास्ट लोकेशन

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अकरा जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीने पुन्हा एकदा वन विभागाच्या पथकांना हुलकावणी दिली. सायखेडा जंगलातील दरीत या नरभक्षक वाघिणीचे ‘लास्ट लोकेशन’ मिळाले असून सखी जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली आहे.वर्षभरापासून राळेगाव व केळापूर तालुक्यातील जंगलात नरभक्षक वाघिणीची दहशत आहे. वन विभागाने गोळा केलेल्या नमुन्यांवरून नरभक्षक वाघीण असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झाले. सध्या सखी, सावरखेडा, उमरी परिसरातील जंगलात वाघिणीचा संचार आहे. या वाघिणीला ट्रँगुलाईज करण्यासाठी २०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक तीन महिन्यांपासून जंगल पालथे घालत आहे. गावकरी, शेतात काम करणाऱ्या मजुरांना अधूनमधून वाघिणीचे दर्शन होते. यातून लोकांचा रोष वाढत आहे. वाघिणीला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले असून शिकारीकरिता वगारी बांधल्या आहेत. आठ दिवसांपूर्वी ही वाघीण शिकारीसाठी बांधलेल्या वगारीजवळ आल्याचे चित्र ट्रॅप कॅमेऱ्यातून घेण्यात आले. मात्र त्यानंतर तिचा माग काढताना वन विभागाच्या यंत्रणेला अनेक अडचणी आल्या.पायांच्या ठशांवरून वाघिणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. २०० अधिकारी-कर्मचारी तैनात असून त्यांच्या दिमतीला २५ वाहने आहे. आतापर्यंत हैद्राबाद, बंग्लोर, दिल्ली या विविध ठिकाणावरून वाघ पकडण्यात तरबेज शूटर व तज्ज्ञ येवून गेले. सध्या बंग्लोरचे एक्सपर्ट व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात ही मोहीम सुरू आहे. तीन ते चार महिन्यांपासून वाघिणीच्या शोधात यंत्रणा एकवटली आहे.हिरवळीमुळे ट्रॅग्युलाईज करण्यास अडसरजंगल हिवरेगार असून मोठ्या प्रमाणात झुडपं आहेत. यामुळे वाघीण दृष्टीपथास आली तरी ट्रँगुलाईज करताना अडचणी येत आहे हे जंगल सुमारे पाच हजार हेक्टर परिसरात असून लगतच्या शेतात पिके आहे. यामुळे वन विभागाच्या यंत्रणा व तज्ज्ञांना वाघिणीला शोधण्यात अडचणी येत असल्याचे वन्यजीव रक्षक डॉ.राजीव विराणी यांनी सांगितले. मानवी हालचाली टिपण्यातही ती यशस्वी ठरत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Tigerवाघ