शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

‘रेड झोन’ गावे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 13, 2014 22:49 IST

पैनगंगा नदीच्या पुराचा वर्षानुवर्ष सामना करणाऱ्या रेड झोनमधील गावांची अद्यापही पुनर्वसनाची प्रतीक्षा संपली नाही. गत १० वर्षांपासून प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे पुनर्वसनाचे भिजत घोंगडे आहे.

नवीन सरकारकडून आशा : १० वर्षांपासून प्रशासन उदासीनअविनाश खंदारे - उमरखेड(कुपटी)पैनगंगा नदीच्या पुराचा वर्षानुवर्ष सामना करणाऱ्या रेड झोनमधील गावांची अद्यापही पुनर्वसनाची प्रतीक्षा संपली नाही. गत १० वर्षांपासून प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे पुनर्वसनाचे भिजत घोंगडे आहे. आता राज्यात नवीन सरकार आरूढ झाले असून या सरकारकडून पूरग्रस्तांना मोठी आशा आहे.उमरखेड तालुक्यातून विशाल पात्र असलेली पैनगंगा वाहते. या नदीच्या तिरावर अनेक गावे आहेत. त्यातील पळशी, संगम चिंचोली, मार्लेगाव, गाडीबोरी, चातारी, देवसरी, बंदी टाकळी यासह अनेक गावांना पुराचा फटका बसतो. पावसाळ्यात गावकरी मृत्यूच्या दाढेत अडकतात. महापूर आला की मुख्यमंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच भेटी देतात. आश्वासनांची खैरात वाटतात. मात्र महापूर ओसरला की आश्वासनेही पुरात वाहून जातात. उमरखेड तालुक्यातील पळशी गावाला २००६ मध्ये महापूराला सामोरे जावे लागले होते. महापुरानंतर पुनर्वसनाच्या आश्वासनाचा पोटतिडकीने पाठपुरावा करण्यात आला. १९५८ आणि २००६ च्या महापुराने सर्वाधिक नुकसान झाले. पैनगंगेच्या वेढ्यात हजारो नागरिक अडकून पडले होते. तेव्हापासून पुनर्वसनाची प्रक्रिया लाल फितीत अडकून आहे. २००६ च्या महापुरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २००७ च्या पावसाळ्यापूर्वी पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. पाऊस व इसापूर धरणाचे पाणी सोडल्याने महापूर नित्याचीच बाब झाला आहे. पळशी येथील नागरिक पुनर्वसनासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेतात. निवेदने देतात. उपोषण करतात, परंतु राजकीय पाठबळ मिळत नाही. प्रशासन त्याची दखल घेत नाही. या गावासोबत नदीतिरावरील अनेक गावे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यात संगम चिंचोली, देवसरी, पळशी या गावांचा समावेश आहे. उमरखेड तहसीलदारांकडून पुनर्वसनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव पुनर्वसनमंत्र्यांकडे पाठविला आहे. मुंबई येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी बैठक झाली होती. त्यावेळी आवश्यक ती जागा उपलब्ध करून तत्काळ पळशी, देवसरी, चिंचोली संगम या गावांचे पुनर्वसन करण्याचे ठरले. त्यावेळी पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, उमरखेडचे तत्कालीन आमदार विजय खडसे, अमरावती महसूल आयुक्त, यवतमाळ जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन सचिव उपस्थित होते. पुनर्वसनासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे ठरले होते. त्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही या भागाचा दौरा केला. एवढे सर्व होऊनही पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. आता नवीन सरकार सत्तारूढ झाले आहे. या सरकारकडून जनतेच्या आशा आहेत.