शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

महसूलची साडेतीन कोटी रुपये वसुली रखडली

By admin | Updated: March 6, 2017 01:27 IST

साडेतीन कोटी रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट महागाव तहसील कार्यालयाला देण्यात आले आहे, ...

गांभीर्यच नाही : महागाव महसूल विभागाने फिरविली उद्दिष्टांकडे पाठ महागाव : साडेतीन कोटी रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट महागाव तहसील कार्यालयाला देण्यात आले आहे, वसुली उद्दिष्ट मोठे असले तरी ते वसूल करण्यासाठी प्रशासन फार काही गांभिर्याने घेताना दिसत नाही. गौण खनीजातून मिळणारे मोठे उद्दिष्टच दुर्लक्षित करण्यात आले आहे. करंजखेड, हिवरदरी, भोसा आणि दहीसावळी रेती घाट हर्रास होण्याआधीच तस्करांनी नेस्तनाबूत केले आहे. या मुख्य पेंडावरून शासनाला मिळणारे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत.करंजखेड रेती घाटावरून शासनाला वीस लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. हर्रासापूर्वी रेती घाट तस्कर आणि संबंधीत यंत्रणेमुळे रिकामा झाला आहे. या घाटावरील रेती तस्करीचा परिणाम पंतप्रधान सडक योजनेतून तयार करण्यात आलेल्या महागाव ते करंजखेड रस्त्यावर झाला आहे. संपूर्ण रस्ता जड वाहतुकीने उखडला आहे. रस्त्यावर तीन कोटींचा केलेला खर्चही मातीमोल गेला.करंजखेड रेती घाटावरून शासनाचे जे उत्पन्न बुडाले तेच भोसा, दहिसावली, हिवरदरी व अन्य ठिकाणावरून झालेले आहे. सर्वाधीक उत्पन्न देणारे रेती घाट आज रिकामे झाले आहे. त्यांची साधी चौकशी होत नसल्याने अजूनही येथून रेती तस्करी सुरु आहे. या रेती घाटापासून मिळणारे उत्पन्न बुडाले आहे. प्रशासनाच्या मूक संमतीने हे घाट रिकामे होत आहेत. परंतु संबंधीतांकडून कार्यवाही होत नसल्याची सल गावकऱ्यांच्या मनात अजूनही सलत आहे.साडेतीन कोटींचे उद्दिष्ट वसूल करण्यासाठी तालुक्यातील पाचही मंडळाना विभागून देण्यात आले आहे. वसूली मधून अपवाद वगळता काही मंडळाने जुजबी वसुली केली आहे. वसूल होणाऱ्या रक्कमेत रेती घाट वगळण्यात आलेले आहे. रेती घाट वगळण्यामागे संबंधीत यंत्रणा आणि तस्करांचे हितसंबंध कारणीभूत ठरत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि अन्य शासकीय कार्यालयांकडून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. त्या तुलनेत महसूल वसुली होत नाही. केवळ नऊ लाख रुपयांची वसुली झाल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली. वास्तविक शासकीय कार्यालयाअंतर्गत सुरू असलेल्या कामांची संख्या आणि दिव्यता लक्षात घेता कोट्यवधी रुपये वसूल होणे गरजेचे असूनही कंत्राटदार आणि प्रशासनातील स्थानिकांचे हित संबंध गुंतले आहे. त्यामुळे प्रशासनाने रेती घाटाच्या वसुलीकडे पाठ फिरवलेली आहे. (शहर प्रतिनिधी)स्थानिकांच्या हितसबंधामुळे शासनाचे नुकसानशासनाने महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट दिले असले तरी ते प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची मानसिकता सध्या दिसून येत नाही. केवळ स्वत:चे हितसंबंध आणि त्यातून आर्थिक लाभ करवून घेण्यावर जोर असल्याने शासनाचे मात्र यामध्ये नुकसान होत आहे. स्थानिक अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांचे असलेले लागेबांधे कुणापासूनही लपून नाही. त्यामुळे स्वत:चे हितसबंध जोपासताना शासनाचे नुकसान झाले तरी त्याची तमा अधिकारी वर्गाला नाही. शासकीय कार्यालयाअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. परंतु शासनाची वसुली मात्र त्या तुलनेत नगण्य असल्याचे चित्र आहे.