शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

विविध कार्यालयातील रेकॉर्ड जीर्ण

By admin | Updated: October 28, 2015 02:43 IST

विविध प्रमाणपत्रांसाठी शासकीय कार्यालयातील जुने कागपत्रे महत्वाचा पुरावा असून ही कागदपत्रे आता जीर्ण झाले आहेत.

नागरिक त्रस्त : हात लावला तरी कागदपत्रांचा पडतो तुकडा दिग्रस : विविध प्रमाणपत्रांसाठी शासकीय कार्यालयातील जुने कागपत्रे महत्वाचा पुरावा असून ही कागदपत्रे आता जीर्ण झाले आहेत. शंभर वर्षापूर्वीच्या या कागदपत्रांना हात लावला तरी तुकडा पडतो. त्यामुळे या दस्तऐवजाचे संगणकीकरण करण्याची आवश्यकता असून तसे न झाल्यास रेकॉर्ड नष्ट होण्याची भीती आहे. महसूल कार्यालयासोबतच कोणत्याही कार्यालयात जुने रेकॉर्ड जपून ठेवले जाते. मात्र आता हे रेकॉर्ड अत्यंत जीर्ण झाले आहे. कागदपत्रांच्या गठ्ठांमधून व्यवस्थित कागद काढणे कठीण झाले आहे. अनेकांना जुन्या रेकॉर्डची गरज भासते. विविध दाखले, प्रमाणपत्र, फेरफार, नक्कल काढण्यासाठी जुने रेकॉर्ड उपयोगी पडते. एखाद्या नागरिकाने रेकॉर्ड फेरफारसाठी अर्ज सादर केल्यानंतर त्याला ते कागदपत्र देताना पाने फाटलेली आढळतात. त्या पानावरील रेकॉर्ड अस्पष्ट असेल तर नागरिकांना माहितीच मिळत नाही. अनेक शासकीय कार्यालयामध्ये रेकॉर्ड ठेवलेल्या खोल्यांमध्ये पावसाळ्यात पाणी गळते. त्यामुळेही जुने रेकॉर्ड खराब झाले आहे. त्यामुळे संबंधित रेकॉर्ड लिपिकाकडून नक्कल मिळविताना नाकीनऊ येतात. अनेकदा तर रेकॉर्ड जुने आहे, नक्कल मिळणार नाही, असे सांगितले जाते. एखाद्याने १० वर्षापूर्वी रेकॉर्डची प्रत काढली असेल आणि पुन्हा तीच प्रत आता हवी असेल तर रेकॉर्ड जाग्यावरच आढळून येत नाही. परिणामी नेमके रेकॉर्ड कुठे गेले, त्यातील पानांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होतो. रेकॉर्ड गहाळ होण्यास संबंधित लिपीकही जबाबदार असतो. वर्षभरात अनेक लिपिकांच्या हातून रेकॉर्ड गेलेले असते. पाने चाळताना जीर्ण पाने फाटतात. या कागदपत्रांचा चुराडा होतो. मात्र त्याचे कुणालाही देणे-घेणे नाही. नागरिकांना रेकॉर्ड मिळत नसल्याने त्यांना मात्र विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. (प्रतिनिधी)