लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी येथील नागरिकांनी वणीच्या इतिहासात पहिल्यांदाच उर्त्स्फूत बंद पाळला. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत रस्त्यावर रेकॉर्डब्रेक शुकशुकाट पहायला मिळाला. सकाळी सात वाजताच्या सुमारास शहरातील काही चौकांमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.‘जनता कर्फ्यू’ च्या पार्श्वभूमीवर वणी शहरातील बाजारपेठ पूर्णत: बंद होती. काही औषधांची दुकाने मात्र प्रशासनाच्या सुचनेवरून सुरू ठेवण्यात आली होती. मात्र त्यानंतर रस्ते ओस पडले. कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता, या विषाणूची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला ‘जनता कर्फ्यू’चा प्रयोग वणीत यशस्वी झाला. दुपारी तर रस्त्यावर स्मशानशांतता पसरली होती. लोकवस्त्यांमध्येही प्रचंड शुकशुकाट होता. शहरातील प्रत्येक नागरिक कुटुंबासह घरात होता. पोलिसांची रस्त्यावरून सतत गस्त सुरू होती. काही ठिकाणी टवाळखोर युवक रस्त्यावर येऊन सेल्फी घेत असल्याचे चित्रही काही ठिकाणी दिसून आले. मात्र पोलिसांना त्यांना वेळीच अटकाव करून तेथून पिटाळून लावले. सायंकाळी ५ वाजता नागरिकांनी घराच्या दारात येऊन कोरोनाशी युद्ध करणाऱ्या आरोग्य विभागातील तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे टाळ्या, थाळी व शंख वाजवून आभार व्यक्त केले.दरम्यान, ठिक पाच वाजताच्या ठोक्याला वणी शहरातील अनेक भागातून पोलीस तथा पालिकेची वाहने सायरन वाजवत फिरत होती. या सायरनला प्रतिसाद देत नागरिक आपापल्या दारात येऊन टाळ्या, थाली, शंख वाजवून कोरोनाच्या विरुद्ध दिवसरात्रं लढा देणाºया प्रशासनाचे आभार मानत होती. सायंकाळी ५ वाजतानंतर मात्र काही लोक आपापल्या अंगणात एकत्र येवून गप्पा मारताना दिसले. खरं तर सकाळी ७ ते रात्री नऊ हा वेळ ‘जनता कर्फ्यू’ साठी घोषित करण्यात आला होता. मात्र सायंकाळी ६ वाजतानंतर अनेक नागरिक दुचाकीने रस्त्यावरून फिरताना दिसले. वणी तालुक्यातील घोन्सा, शिरपूर, कायर, शिंदोला, राजूर कॉलरी, नांदेपेरा, उकणी या मोठ्या गावांतही उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. ग्रामीण नागरिकही पहिल्यांदाच दिवसभर घराबाहेर पडले नाहीत. वणीचे एसडीपीओ सुशिलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव, तहसीलदार श्याम धनमने तसेच नगरपालिकेचे पथक शहरात सतत गस्त घालून परिस्थितीचे अवलोकन करीत होते. नागरिकांनी ‘जनता कर्फ्यू’ला दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून प्रशासनही भारावून गेले. शहरात दिवसभर नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. प्रशासनाने दक्षता घेतली. महसूल, पोलीस व इतर विभागांनीही जनता कर्फ्यू शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी कंबर कसली होती. नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला. त्यामुळे शंभर टक्के यश मिळाले. सायंकाळी जनतेने टाळ्या वाजवून प्रशासनाचे कौतुक केले.वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्याचे आवाहनकोरोना या आजारापासून दूर रहायचे असेल तर वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्या, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. यात हाताची स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. यासाठी साधा, साबण, हॅन्डवॉश, किंवा सॅनेटायझरचाही उपयोग अतिशय मोलाचा ठरतो. दिवसांतून जेवढे वेळा शक्य आहे, तेवढ्यावेळा हात धुवा, असे आवाहनही डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. त्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक नागरिक आता आपली जुनी परंपरा निभावताना दिसून येत आहे.वणी ग्रामीण रुग्णालय सज्जग्रामीण रुग्णालयात रविवारपर्यंत १५५ लोकांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्याने त्यांना ‘होम क्वारंटाइन’ करण्यात आल्याचे वणी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कमलाकर पोहे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
वणीत रेकॉर्डब्रेक शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST
‘जनता कर्फ्यू’ च्या पार्श्वभूमीवर वणी शहरातील बाजारपेठ पूर्णत: बंद होती. काही औषधांची दुकाने मात्र प्रशासनाच्या सुचनेवरून सुरू ठेवण्यात आली होती. मात्र त्यानंतर रस्ते ओस पडले. कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता, या विषाणूची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला ‘जनता कर्फ्यू’चा प्रयोग वणीत यशस्वी झाला. दुपारी तर रस्त्यावर स्मशानशांतता पसरली होती. लोकवस्त्यांमध्येही प्रचंड शुकशुकाट होता.
वणीत रेकॉर्डब्रेक शुकशुकाट
ठळक मुद्देरस्ते सुनसान : मंदिरेही बंद, काही चौकांमध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी