शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्विलोकनाने केला घाटंजी, आर्णीचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 21:24 IST

आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतींबाबत शासनाने पुनर्विलोकन केले आहे. मात्र, जिल्ह्यातील घाटंजी आणि आर्णी तालुक्यातील कर्मचाऱ्यांना आता लाभातून वगळण्यात आले.

ठळक मुद्देलाभातून डावलले : शिक्षक समन्वय समितीने घेतली खासदारांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतींबाबत शासनाने पुनर्विलोकन केले आहे. मात्र, जिल्ह्यातील घाटंजी आणि आर्णी तालुक्यातील कर्मचाऱ्यांना आता लाभातून वगळण्यात आले. ‘कठीण क्षेत्रा’च्या निकषात बसत असतानाही या दोन तालुक्यांचा समावेश न झाल्याने हादरलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट खासदारांकडे धाव घेतली आहे.राज्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना गेल्या १५ वर्षांपासून एकस्तर पदोन्नतीसह विविध बिगर आर्थिक स्वरुपाचे लाभ दिले जातात. परंतु, गेल्या वर्षी राज्य शासनाने या सवलतींचा फेरविचार केला. हे लाभ जैसे थे ठेवावे की बंद करावे, याबाबत नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समिती नेमण्यात आली होती. या समितीने अहवाल शासनाला सादर केला.त्यात आदिवासी व नक्षलग्रस्त भाग असे वर्गीकरण करण्याऐवजी ‘कठीण भाग’ व ‘सर्वसाधारण भाग’ असे वर्गीकरण करण्यात आले. कठीण भागात राज्यातील ६२ तालुक्यांचा समावेश करण्यात आला. आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव, झरीजामणी, घाटंजी, आर्णी या तालुक्यांना प्रोत्साहनपर सवलती मिळत होत्या. नव्या अहवालात मात्र घाटंजी, आर्णी, वणी आदी तालुक्यांना डावलण्यात आले. त्यामुळे या तालुक्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांनी समन्वय समितीच्या नेतृत्वात थेट खासदार हंसराज अहीर यांच्याकडे व्यथा मांडली. तसेच आमदार राजू तोडसाम यांनाही निवेदन दिले. यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष रवींद्र उमाटे, सचिव विशाल साबापुरे, मनोज गवळी, एस. पी. लाकडे, प्रशांत गवळी, संतोष कर्णेवार, अशोक माहुर्ले, रमेश डोहळे, रमेश कनाके, गजानन बेजारपवार, उषाताई बावनकुळे, स्वाती महाजन आदी उपस्थित होते.मानव विकास मिशनमध्ये पात्रपुनर्विलोकन समितीने ‘कठीण क्षेत्र’ ठरविताना प्रामुख्याने मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या तालुक्यांना प्राधान्य दिले. घाटंजी आणि आर्णी या दोन्ही तालुक्यांचा मानव विकास निर्देशांक कमी आहे. या तालुक्यांमध्ये मानव विकास मिशन अंतर्गत विविध कामेही सुरू आहेत. तरीही ‘कठीण क्षेत्रात’ या तालुक्यांना स्थान न दिल्याने कर्मचाºयांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर