शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

वणीत पुन्हा शस्त्रसाठा जप्त

By admin | Updated: March 28, 2016 02:16 IST

आठवडाभरापूर्वी अग्निशस्त्रासह अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून वणी पोलिसांनी शनिवारी रात्री

वणी : आठवडाभरापूर्वी अग्निशस्त्रासह अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून वणी पोलिसांनी शनिवारी रात्री पुन्हा शस्त्रसाठा जप्त केला. भद्रावतीच्या नगरसेवकासह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून तीन पिस्तूल, दोन एक्सट्रा मॅग्झीन आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. संजय रामआशिष सिंग रा. राजूर कॉलरी, नगरसेवक प्रमोद परशराम नेवासे रा. भद्रावती आणि अशोक चारुदत्त देठे रा. कुंभारखणी यांना पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. या तिघांना २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गत २० मार्च रोजी वणी पोलिसांनी एका वाहनाची झडती घेतली. त्यावेळी जतिंदरसिंग ऊर्फ कालू सज्जन सिंग, गॅरीआॅगस्टीन जोसेफ दोघे रा. भालर वसाहत, विजयसिंह नंदकिशोर सिंग रा. बोधेनगर चिखलगाव यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तपासणी केली असता जतिंदरसिंगजवळ देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, सहा राऊंड क्षमतेचे सिलिंडर आणि वाहनात दोन धारदार तलवारी आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, एके-४७ रायफलचे १३ जिवंत काडतूस, दोन हत्तीमार राऊंड, एक खाली केस, चार धारदार तलवारी आढळून आल्या होत्या. पोलिसांनी त्यांना अटक करून कोठडी घेतली. चौकशीत त्यांनी अग्नीशस्त्रे भद्रावती येथील नगरसेवक प्रमोद नेवासे, संजय सिंग, अशोक देठे यांना विकल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी शनिवारी या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील अवैध हत्यारे जप्त केली. तसेच या तिघांनाही अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यांना २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींनी हत्यारे जवळ का बाळगली, त्यांचा काय हेतू होता तसेच आणखी कुणाला घातक हत्यारे अवैधपणे पुरविली का याचा शोध पोलीस घेत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव गिरी, वणीचे ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सुदर्शन वानोळे, सै.साजीद, सुनील खंडागळे, रुपेश पाली, सुधीर पांडे, शे. नसीब, रत्नपाल मोहाडे, प्रकाश बोर्लेवार यांनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)