शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

शासकीय योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:33 IST

शासन आणि प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. शासनाने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयाची प्रशासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी येथे केले.

ठळक मुद्देमदन येरावार : पुसद येथे उपविभागीय आढावा बैठक, प्रभावी अंमलबजावणीचे प्रशासनाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शासन आणि प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. शासनाने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयाची प्रशासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी येथे केले.येथील उपविभागीय कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार मनोहरराव नाईक, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार संजय गरकल, माजी राज्यमंत्री संजय देशमुख उपस्थित होते. पालकमंत्री येरावार म्हणाले, पुसद तालुका हा जिल्ह्यात सर्वात मोठा असल्याने येथे उद्दिष्टही मोठे आहे. पुसदचा परिणाम जिल्ह्यावर होत असतो. त्यासाठी अधिका-यांनी शासकीय नोकरीत नवनवीन कल्पना राबवाव्या व कामासाठी स्वत: पुढाकार घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. शासकीय, अनुदानित आश्रमशाळेत मुला-मुलींचे स्वतंत्र शौचालय, सॅनेटरी नॅपकीन मशीन, बायोमेट्रीक हजेरी मशीन, वॉटर फिल्टर या सुविधांचा अहवाल सादर करण्याचे त्यांनी निर्देश दिले. राहणार नाही, याची काळजी घ्यावी, नगर परिषदेने अपंगांच्या कल्याणासाठी तीन टक्के निधी राखून ठेवावा. त्यांच्यासाठी वेगळा कक्ष निर्माण करावा. तसेच अपंगांच्या याद्या अपडेट कराव्यात, असे सांगितले.यावेळी आदिवासी विभाग, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास योजना, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार, दलित वस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना, अंगणवाडी इमारत, दिग्रस-दारव्हा-कारंजा महामार्ग भुसंपादन, पाणीटंचाई आदींचा आढावा घेतला. बैठकीला लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स.म.निवल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी राजीव चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष पवार, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी इवनाथे उपस्थित होते.