शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

रेशन दुकान परवान्याचे धोरण बदलले

By admin | Updated: June 26, 2015 02:21 IST

शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने कुटुंबाच्या व्याख्येसंदर्भात नवीन धोरण ठरविले आहे.

वारसा हक्क : विवाहित मुली आणि सावत्र मुलांनाही मिळणार परवानादारव्हा : शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने कुटुंबाच्या व्याख्येसंदर्भात नवीन धोरण ठरविले आहे. केरोसीन आणि स्वस्त धान्य दुकानाचा वारसा हक्क विवाहित मुलींसह सावत्र मुलांनाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबतचा अध्यादेश नव्याने पारित करण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानासाठीच्या परवानाधारकाचे वारस ठरविण्याकरिता आणि केरोसीन दुकानांसाठीचे वारस ठरविण्याकरिता असे दोन वेगवेगळे शासनाचे आदेश होते. दोन्ही शासन निर्णयात वेगवेगळ्या वारसांना वारसाहक्क नमूद केल्याने दुकान हस्तांतरित होत असताना भेदभाव होत होता. आता नव्या सर्वसमावेशक आदेशानुसार या दोन्ही बाबतीत एकसमानता आणण्यात आली आहे. किरकोळ केरोसीन परवानाधारक, हॉकर्स, अर्धघाऊक परवानाधारक यांच्या मृत्यूनंतर परवानाधारकांच्या वारसाच्या नावे परवाना वर्ग करताना कुटुंबाच्या व्याख्येबाबत नवीन धोरण ठरविले आहे. परवानाधारकाची पत्नी अथवा पती, सज्ञान मुलगा, सज्ञान मुलगी, सज्ञान अविवाहित मुलगी, परवानाधारकावर अवलंबून असणारे आई-वडील, सून, दत्तकपुत्र, परवानाधारकावर अवलंबून असणारी घटस्फोटीत मुलगी यांचा समावेश या व्याख्यात करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशात किरकोळ केरोसीन परवाना आणि रास्तभाव दुकान परवाना वारसाने वर्ग करताना कुटुंबाच्या व्याख्यात विवाहित मुलीचा समावेश केला आहे. या सुधारित शासन निर्णयात परवानाधारकाच्या मृत्यूनंतर वारसाच्या नावे परवाना वर्ग करताना कुटुंबाची व्याख्यान बदलविली आहे. पुरुष परवानाधारकाच्या बाबतीत एक व अनेक पत्नी, यात न्यायिक फारकत घेतलेल्या पत्नीचाही समावेश केला आहे. महिला परवानाधारकाच्या बाबतीत पतीचाही समावेश करण्यात आला आहे. यासह अवलंबित आई-वडील, सज्ञान मुले-मुली, सावत्र, दत्तक, अविवाहित मुले-मुली, घटस्फोटीत मुली, सून, भाऊ, अविवाहित बहिणी, विधवा बहिणी, सज्ञान सावत्र बहिणी आदींचा समावेश करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)