शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ ‘काळ्या पंखांचा कोकीळ’ आढळला यवतमाळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 07:50 IST

राज्यात पहिलीच नोंद; चौसाळा जंगलात घेतली छायाचित्रे

- अविनाश साबापुरेयवतमाळ : विदर्भासह महाराष्ट्रात दुर्मीळ असलेला ‘काळ्या पंखांचा कोकीळ’ हा पक्षी शनिवारी यवतमाळात आढळून आला. अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राणिशास्त्राचे प्राध्यापक डाॅ. प्रवीण जोशी यांनी ही नोंद घेतली.शनिवारी सकाळी  नियमित पक्षीनिरीक्षणादरम्यान चौसाळा जंगल क्षेत्रात हा पक्षी आढळला. ‘आययूसीएन  रेड डेटा लिस्ट’नुसार त्याचा वावर मुबलक असला तरी महाराष्ट्रासाठी हा पक्षी दुर्मीळ आहे. ‘ई बर्ड’च्या वेबसाइटवर यापूर्वी नोंद नसलेल्या ‘ब्लॅक विंग्ड कुक्कुश्राइक’ अर्थात ‘काळ्या पंखांचा कोकीळ’ याची विदर्भातील पहिली नोंद यवतमाळात डॉ. जोशी यांनी घेतली आहे. हा पक्षी  दक्षिण ते दक्षिणपूर्व आशियामध्ये सामान्यतः ईशान्य पाकिस्तानमधून खालच्या हिमालयी प्रदेशातून (उत्तरांचल, नेपाळ, अरुणाचल प्रदेश) आणि पूर्वोत्तर म्यानमारच्या टेकड्यांमध्ये, तसेच चीन आणि दक्षिणपूर्व आशियात आढळताे. ते हिवाळा हिमालयाच्या पायथ्याशी घालवतात. कधी-कधी लांब अंतर पार करतात केरळपर्यंत येतात. हा एक मध्यम आकाराचा, गडद काळा- पिसारा व संपूर्ण राखाडी रंगाचा पक्षी असून, पिसाऱ्याखाली धूसर असतो. डोळ्याभोवती पांढरी किनार ही या पक्ष्याची खास ओळख आहे. पक्षीनिरीक्षणादरम्यान अत्यंत उंच झाडे असलेल्या भागामध्ये सूर्यप्रकाश फारच कमी असताना अचानक लक्ष गेले तेव्हा या पक्ष्याची जोडी दिसली. नर उडाला; परंतु मादीचा लक्षात येण्याएवढा फोटो मिळाला.- प्रा. डॉ. प्रवीण जोशी, प्राणिशास्त्र विभाग, अमोलचंद महाविद्यालय, यवतमाळचार वर्षांपूर्वीचे भाकीत खरे ठरलेपुणे येथील निनाद अभंग यांनी चार वर्षांपूर्वी ‘ई-बर्ड’च्या साहाय्याने या पक्ष्याच्या स्थलांतराचा एक नकाशा तयार केला होता. तेव्हा तो महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यातून जाऊ शकतो हेसुद्धा भाकीत केले होते. ते आज सत्य झाले. त्यांनीच आणि ‘बीएनएचएस’चे नंदकिशोर दुधे यांनीही या काळ्या पंखांचा कोकीळची माझ्यासोबतच पुष्टी केली, असे डॉ. जोशी म्हणाले. त्यांच्या मते यवतमाळातील ही नोंद विदर्भासाठी, तसेच महाराष्ट्रासाठीसुद्धा पक्षीनिरीक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.