शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजूरचे पाणी निर्गुडा नदीत सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 22:30 IST

हो.. नाही म्हणत अखेर राजूर खाणीतील पाणी वणीच्या निर्गुडा नदीत सोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला. सदर पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल वणी पंचायत समितीच्या पाणी परीक्षण प्रयोगशाळेने दिल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला.

ठळक मुद्देवणी नगरपरिषदेचा निर्णय : पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : हो.. नाही म्हणत अखेर राजूर खाणीतील पाणी वणीच्या निर्गुडा नदीत सोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला. सदर पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल वणी पंचायत समितीच्या पाणी परीक्षण प्रयोगशाळेने दिल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला.गेल्या १५ दिवसांपासून वणी शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा ठप्प आहे. नवरगाव धरणातही पाण्याचा अल्पसाठा असल्याने तेथूनही आवश्यक पाणी सोडले जात नसल्याने वणीतील पाण्याची स्थिती भयावय आहे. नागरिकांचे पाण्यासाठी अक्षरश: हाल सुरू आहेत. ही बाब लक्षात घेऊन काही नगरसेवकांनी राजूर खाणीतील पाणी निर्गुडा नदीत सोडण्याची मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे केली होती. वर्धा नदीवरून पाणी पुरवठा योजना सुरू होईस्तोवर राजूर खाणीतील पाण्याचा वणीकरांना मोठा आधार होईल, असे या नगरसेवकांचे म्हणणे होते. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी या निवेदनाची तातडीने दखल घेत बुधवारी चिखलगाव परिसरात साठलेल्या राजूर खाणीतील पाण्याची पाहणी करून हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याची चाचपणी करण्याच्या सूचना नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना केल्या. मात्र या पाण्यात क्षार व आर्यन मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता लक्षात घेऊन नगराध्यक्ष बोर्डे यांनी हे पाणी नदीत सोडण्यास सुरूवातीला नकार दिला होता. मात्र तपासणीअंती गुरुवारी रात्री या पाण्याचा अहवाल प्राप्त झाला. सदर पाणी केवळ वापरण्यायोग्य नाही तर पिण्यायोग्यदेखील असल्याचा अहवाल वणी पंचायत समितीच्या पाणी परीक्षण प्रयोगशाळेने दिल्यानंतर सदर पाणी निर्गुडा नदीत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.लिकेज बंद केल्यास तीन दिवसांत पाणी पोहचणारसन २००४ मध्ये वणी शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी वणी नगरपालिकेच्या तत्कालिन सत्ताधाºयांनी राजूर खाणीतील पाणी पाईपलाईन टाकून वणीतून वाहणाऱ्या निर्गुडा नदीत सोडले होते. मात्र एक महिन्यानंतर पाणी टंचाई संपली. त्यामुळे ही पाईपलाईन निकामी पडून होती. परिणामी या पाईपलाईनला अनेक ठिकाणी लिकेजस आहे. हे लिकेजसची दुरूस्ती तातडीने झाल्यास तीन दिवसांत खाणीचे पाणी नदीत पोहचणार आहे.

टॅग्स :Waterपाणी