शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

राजूदास जाधव यांच्या सहकार पॅनलला १३ जागा

By admin | Updated: January 26, 2016 03:12 IST

जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजूदास जाधव यांच्या नेतृत्वातील

 यवतमाळ : जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजूदास जाधव यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने १७ पैकी सर्वाधिक १३ जागा पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले. विरोधी महासमन्वय पॅनलला चारच जागांवर विजय मिळविता आला. वृत्तलिहेस्तोवर विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. काही जागांवर फेरमतमोजणी सुरू होती. या निवडणुकीत सात हजार ७१२ पैकी सात हजार ११ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. रविवारी हे मतदान घेण्यात आले. सोमवारी सकाळी येथील दारव्हा रोड स्थित गुरुदेव मंगल कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ झाला. सहकार पॅनलचे प्रमुख राजूदास जाधव यांच्या नेतृत्वात तर महासमन्वय पॅनलचे मधुकर काठोळे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. मतदानाच्या दिवशी एखाद्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसारखे वातावरण होते. प्रत्येक मत मिळविण्यासाठी दोनही पॅनलकडून धडपड शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती. त्यामुळेच ९१ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. सहकारचे १३ उमेदवार विजयी झाल्याची माहिती पॅनल प्रमुख राजूदास जाधव यांनी दिली. महासमन्वयचे चार उमेदवार विजयी झाल्याचे मधुकर काठोळे यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी) सहकार पॅनलचे विजयी उमेदवार ४राजूदास जाधव, डॉ. दिलीप चौधरी, दीपक दोडके, एकनाथ गाडगे, अनिल जयसिंगपुरे, चित्तरंजन कडू, गौतम कांबळे, राजेंद्र पिंपळशेंडे, प्रवीण राणे, राजेंद्र ठाकरे, नंदेश चव्हाण, मारोती आत्राम, नंदा चाटे.महासमन्वय पॅनलचे विजयी उमेदवार ४मधुकर काठोळे, सुचिता बोंद्रे, मुकेश भोयर, संजय गावंडे.