शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

टंचाईत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 22:33 IST

घरबांधणीची परवानगी देताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपालिकेला आता कडव्या टंचाईने ठिकाणावर आणले आहे. प्यायला पाणी पुरविणे अशक्यप्राय झालेले असताना प्रशासनाने घरोघरच्या ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची शनिवारपासून झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देघरोघरी वृक्ष गणना : भीषण पाणीटंचाईने नगर परिषदेला आणले ताळ्यावर

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घरबांधणीची परवानगी देताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपालिकेला आता कडव्या टंचाईने ठिकाणावर आणले आहे. प्यायला पाणी पुरविणे अशक्यप्राय झालेले असताना प्रशासनाने घरोघरच्या ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची शनिवारपासून झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रकार आताच नेमका कशासाठी, असा प्रश्न पडला आहे.विशेष म्हणजे, तापमान ४४ अंशांच्या पलिकडे गेल्यावर नगरपालिकेला यवतमाळातील झाडांची संख्या मोजण्याचेही शहाणपण सुचले आहे. पाणीटंचाई जीवघेणी बनल्यावर आणि मे महिना तापल्यावर शुक्रवारी नगरपालिकेत यासंदर्भात बैठक घेण्यात आली. शहरात पावसाचे पाणी थांबवायचे असेल तर, झाडांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. अडीच लाख लोकसंख्या असताना किमान अडीच तीन लाख मोठी झाडे असणे गरजेचे आहे. पण त्यादृष्टीने कधीच प्रयत्न होत नाही. वास्तविक, शहरातील झाडांबाबत १९७५ सालच्या महाराष्ट्र वृक्षजतन कायद्याचे काटेकोर पालन केल्यास दर पाच वर्षांनी वृक्षगणना करणे बंधनकारक आहे. पण नागरिक आणि प्रशासन त्याकडे आजवर दुर्लक्ष करीत आलेले आहे. आता पाण्याविना प्राण कंठाशी आल्यावर प्रशासनाला या कायद्याची अचानक आठवण झालेली आहे. शनिवारपासून भर उन्हात फिरून पालिकेचे कर्मचारी दरडोई किती झाडे आहेत, याचा सर्वे करणार आहेत. यात १५ फुटावरील आणि खालील झाडे किती, झाडांची गोलाई किती, त्रिज्या किती अशी माहिती गोळा केली जाणार आहे.त्याचवेळी किती घरांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करून पावसाचे पाणी जमिनीत मुरविले जाते, याचीही झाडाझडती घेतली जाणार आहे. प्रत्यक्षात घर बांधकामाची परवानगी देतानाच नगरपालिकेकडून ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची अट घातली जाते. पण क्षुल्लक पैसे वाचविण्यासाठी नागरिक ही अट टाळतात आणि नगरपालिकेचे प्रशासनही त्याकडे कानाडोळा करत आलेले आहे. यवतमाळातील प्रत्येक घरात रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेली असती, तर आज टंचाईची तीव्रता बºयाच प्रमाणात कमी असती, असा साक्षात्कार आता प्रशासनाला झालेला आहे. अर्ध्याअधिक घरांमध्ये असे हार्वेस्टिंग न आढळण्याचीच शक्यता अधिक आहे.तीन दिवसात उरकणार का सर्वे?विशेष म्हणजे, अडीच लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरात केवळ तीन दिवसात हे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी नगरपालिकेच्या कर्मचाºयांवर सोपविण्यात आली आहे. आरोग्य विभाग, कर विभाग आणि शिक्षकांची शुक्रवारी बैठक घेऊन त्यांना सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले. यात सफाई कर्मचारी आणि प्रामुख्याने शिक्षकांना जुंपण्यात येणार आहे. शहरात इमारती किती, त्यात कम्पाउंड किती, त्यात झाडे किती, विहिरी किती, विंधन विहिरी किती अशी माहिती गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ही माहिती केवळ तीन दिवसात कशी गोळा होणार, असा प्रश्न कर्मचाºयांनी बैठकीत उपस्थित केला.