शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

रेनवॉटर हार्वेस्टिंग योजनेचा फज्जा

By admin | Updated: June 29, 2015 00:25 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने छतावरील पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करणे बंधनकारक आहे.

नियम कागदावर : हजारो लिटर पाणी रस्त्यावर पुसद : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने छतावरील पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करणे बंधनकारक आहे. एवढेच नव्हे, तर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अटीवरच नवीन घराच्या बांधकामाला परवानगी मिळते, मात्र कागदावर असलेले हे नियम प्रत्यक्ष कृती उतरवण्याबाबत कमालीची उदासीनता दिसून येतेच. पूर्वी हातपंप व विहिरीची संख्या अत्यल्प होती. त्यामुळे भूजल पातळी आजच्या एवढी खालावत नव्हती. अगदी पाच-दहा फुटावर विहिरीत भरपूर पाणी राहत असे. परंतु अलिकडील काळात हातपंप व विहिरींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने भूगर्भातील पाण्याचा उपसा सतत होत असतो. त्या तुलनेत भूजल पातळी वाढ व्हावी हा सकारात्मक दृष्टीकोण समोर ठेऊन शासनाने शहरातील शाळा, महाविद्यालय, शासकीय इमारती, नवीन बांधकामांना रेन हार्वेस्टिंग करणे आवश्यक केले. पाच वर्षापूर्वी या योजनेसंदर्भात मोठा गाजावाजा करण्यात आला होता. त्या दृष्टीने शहरातील शासकीय विश्रामगृह, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम, सिंचन विभाग, न्याय मंदिर आदी कार्यालयामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था काही ठिकाणी करण्यात आली होती. जेणे करून पावसाचे छतावरून पडणारे पाणी वाहून न जाता त्याच ठिकाणी जमिनीत मुरावे ही संकल्पना अस्तित्वात आणली. मात्र अल्पावधीतच या रेन वॉटर हार्वेस्टिंग कामाचे पाईप फुटले तर काही साहित्य लंपास झाल्याचे दिसून येत आहे. काही विभागांनी तर या योजनेची अंमलबजावणी केलीच नाही. त्यामुळे शासनाने या उदात्त हेतूने ही योजना राबविण्यास प्रवृत्त केले. त्या उद्देशाला तडे गेले आहे. तसेच याबाबत शासकीय कार्यालयाकडून पाणी बचतीचे महत्व लक्षात आणून देण्यास प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आगामी काळात पावसाचे पडणारे पाणी गावातच न मुरता गावाबाहेर वाहून जाईल. परिणामी भविष्यात भूजल पातळीत कमालीची घट होऊन नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल ही वस्तुस्थिती आहे. या उपक्रमाबाबत जनजागृती केल्यास रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून गावातले पाणी गावातच राहील व भूजल पातळी वाढण्यात भर पडेल. मात्र याबाबत अधिकारी व लोकप्रतिनिधींना या योजनेचा विसर पडल्याने योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पाहावयास मिळत आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत प्रशासनाच्यावतीने हवी तशी प्रसिद्धी केली जात नाही. त्यामुळे नागरिकही रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याच्या भानगडीत पडत नाही. (तालुका प्रतिनिधी)