शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पुसद, उमरखेड विभागात पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 05:00 IST

पुसद उपविभागात गेल्या आठवडाभरापासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. गेल्या दोन दिवसात ३४.६२ मिमी पाऊस कोसळला. तालुक्यात आतापर्यंत तब्बल ७७३.५२ मिमी पावसाची नोंद झाली. शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पूस धरण, वेणी धरण आणि इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. तिन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देसोयाबीनला फुटले कोंब : शेतकरी संकटात, नदी-नाल्यांना पूर

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद /उमरखेड : गेल्या काही दिवसांपासून पुसद आणि उमरखेड उपविभागात पावसाचा कहर सुरूच आहे. गेल्या दोन दिवसात तर पावसाने शेतकऱ्यांना संकटाच्या खाईतच लोटले. पुसद उपविभागात दोन दिवसात ३४ मिमी पाऊस कोसळला. उमरखेड उपविभागातही संततधार पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहे.पुसद उपविभागात गेल्या आठवडाभरापासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. गेल्या दोन दिवसात ३४.६२ मिमी पाऊस कोसळला. तालुक्यात आतापर्यंत तब्बल ७७३.५२ मिमी पावसाची नोंद झाली. शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पूस धरण, वेणी धरण आणि इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. तिन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी-नाल्याना पूर आला असून शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली सापडली आहे. पुसद तालुक्यात ब्राह्मणगाव, गौळ खु., वरूड, बोरी खु., जांबबाजार, शेंबाळपिंपरी, बेलोरा, खंडाळा आणि पुसद सर्कलमध्ये सातत्याने पाऊस कोसळत आहे. गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सोबतच पावसाची रिपरिपही सुरू होती. पुसद आणि दिग्रस तालुक्यातील शेती पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनला जागीच कोंब फुटले आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी संभाजीराव टेटर यांनी केली आहे. आमदार इंद्रनील नाईक यांनीही कृषी विभागाकडे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली. तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ यांनी सर्व मंडळ अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.उमरखेड तालुक्यातही पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले. पैनगंगा नदी काठावरील ५५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नदी काठावरील शेकडो हेक्टरवरील खरीप पिके पाण्याखाली सापडली आहे.सोयाबीनला जागीच कोंब फुटत असल्याने शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले आहे. आमदार नामदेव ससाने यांनी बुधवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन उमरखेड व महागाव तालुक्यातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली. तसेच शेतकºयांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचीही मागणी केली.दिग्रस आणि महागाव तालुक्यात नुकसानपुसद आणि उमरखेड उपविभागातील दिग्रस आणि महागाव तालुक्यातही शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी देशोधडीला लागत आहे. अनेकांनी याबाबत तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांकडे आपबिती कथन केली. काही शेतकºयांनी कृषी अधिकाºयांना सडलेले सोयाबीन दाखवून तातडीने सर्वेक्षणाची मागणी केली.

टॅग्स :agricultureशेती