शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाचे थैमान, तीन तालुक्यांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST

सोमवारी यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ११२.७ मिमी पाऊस बाभूळगाव तालुक्यात, ९३ मिमी पाऊस कळंब तालुक्यात तर ६५ मिमी पाऊस केळापूर तालुक्यात कोसळला. यवतमाळ तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले आहे. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५४ मिमी पावसाची नोंद झाली असून बाभूळगाव, कळंब आणि केळापूर तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केळापूरमध्ये ६५ मिमी, कळंबमध्ये ९३ मिमी तर बाभूळगाव तालुक्यात ११२.७ मिमी एवढा विक्रमी पाऊस कोसळला. इतर तालुक्यांतही पावसाचा जोर कायम होता. मागील चार दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ११२.७ मिमी पाऊस बाभूळगाव तालुक्यात, ९३ मिमी पाऊस कळंब तालुक्यात तर ६५ मिमी पाऊस केळापूर तालुक्यात कोसळला. यवतमाळ तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. येथे ४६.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दारव्हा ४२.८, दिग्रस ६३.१, आर्णी ३९.२, नेर ५३.२, पुसद ६०.१, उमरखेड ५१.९, महागाव ४७, वणी ३९.४, मारेगाव ५८.५, झरी जामणी ५८.२, राळेगाव ४२.१ तर घाटंजी तालुक्यात २२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.  

जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तुडुंब भरलेयवतमाळ : मागील चार दिवसात जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प तुडुंब झाले आहेत. अरुणावती बेंबळासह प्रमुख प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अरुणावतीचे पाच गेट १० सेंटीमीटरचे उघडून ६० क्यूबिकने पाणी सोडण्यात आले आहे, तर बेंबळाचे १६ दरवाजे ५० सेेंटीमीटरने उघडून प्रकल्पातून ८४८ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बेंबळा जलाशयाची पाणी पातळी ३९८.७८ मीटर आहे. हा प्रकल्प १०० टक्के भरला असून, १३७.२६ क्यूबिकने पाणी सोडण्यात येत आहे. अरुणावती प्रकल्पाची जलाशय पातळी ३३०.७५ मीटर आहे. या प्रकल्पात ९७.८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. बेंबळा प्रकल्पाची जलाशय पातळी २६७.९५ मीटर आहे. या प्रकल्पात ९८.३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, तर गोकी, वाघाडी, नवरगाव, बोरगाव आणि सायखेडा १०० टक्के भरले आहेत. याबरोबरच अधरपूस प्रकल्पात ९५.३७ टक्के, अडाण प्रकल्पात ९३.९० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा- बेंबळासह जिल्ह्यातील सर्वच प्रमुख प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. वाढती पाणीपातळी लक्षात घेता नदीकाठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. आजवर पूस प्रकल्प परिसरात ६५१, अरुणावती ९१८, बेंबळा ५६५, गोकी ६३७, अधरपूस ५७८, बोरगाव ६५०, तर अडाण प्रकल्प परिसरात ८८५ मिमी पाऊस झाला आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर