शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

ठाण्यात शिरले पावसाचे पाणी

By admin | Updated: July 1, 2016 02:30 IST

गुरुवारी सकाळी ६ ते ८ या दोन तासात कळंब परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. चक्रवती नदीला पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर मोठा पूर आला.

कळंब-दत्तापूर रस्ता जलमय : चक्रावती नदीला अनेक वर्षांनंतर आला पूरकळंब : गुरुवारी सकाळी ६ ते ८ या दोन तासात कळंब परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. चक्रवती नदीला पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर मोठा पूर आला. एवढेच नाही तर कळंब पोलीस ठाण्यासह इतर शासकीय व निमशासकीय संस्थेतही पाणी घुसले.येथील पोलीस ठाण्यात तर गुडघाभर पावसाचे पाणी शिरले. यामध्ये काही कागदपत्रेही ओली झाली. एवढेच नाही तर पोलिसांना ठाण्यात प्रवेश करणेही कठीण झाले होते. तसेच तहसील कार्यालय, श्री चिंतामणी हायस्कुलही पावसाच्या पाण्याचे जलमय झाले होते. नदीच्या पुराचे पाणी काही घरात घुसले, परंतु कुठलीही हानी झाली नाही. दोन तास झालेल्या जबरदस्त पावसामुळे गावातील रस्तेही जलमय झाले होते त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. दत्तापूरचे रस्त्याचे अतिशय निकृष्ठ झाल्याचे या पावसामुळे स्पष्ट झाले. येथील दत्तापूर रोडवर दुपदरी रस्त्याचे नुकतेच काम करण्यात आले. दोन्ही बाजुला प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले. परंतु पावसाचे पाणी जाण्यास कुठलीही परिणामकारक योजना आखण्यात आली नाही. त्यामुळे आज पहिल्याच पावसात रस्त्यावर दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक पुर्णत: बंद झाली होती. विशेष म्हणजे यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाागाकडे कामाच्या गुणवत्तेविषयी वारंवार तक्रारी करण्यात आल्या. परंतु कुठलीही दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे निकृष्ट झालेल्या या कामांंचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता बांधकाम विभागाने संबधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)