शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

वणी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यात पाऊस

By admin | Updated: June 22, 2015 02:11 IST

वणी आणि मारेगाव तालुक्यात गेल्या २० तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे.

वणी/मारेगाव : वणी आणि मारेगाव तालुक्यात गेल्या २० तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दोनही तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या २४ तासांत मारेगाव तालुक्यात ६३, तर वणी तालुक्यात तब्बल ७२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे सोयाबीन बियाणे जमिनीत दबण्याची शक्यता वाढली आहे.शनिवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास या दोनही तालुक्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली. यावेळी विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासूनच दोनही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. वणी तालुक्यात शनिवारी रात्रभर आणि रविवार पुन्हा पहाटेपासून पाऊस सुरू झाला. रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. त्यामुळे शहरासह तालुक्यातील जीनजीवनावर त्याचा परिणाम झाला. तथापि रविवारी सुटी असल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.वणी तालुक्यात कपाशीची बहुतांश पेरणी आटोपली आहे. आता काही शेतकऱ्यांनी सोयाबिनची पेरणी सुरू केली आहे. मात्र शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे जमिनीतील सोयाबीन बियाणे आता दबण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. यावर्षी समाधानकारक पावसामुळे कपाशीची पेरणी व्यवस्थित झाली. त्यामुळे बळीराजा समाधानी दिसत होता. मात्र शनिवारी सायंकाळापसून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता चिंतेचे भाव उमटू लागले आहेत.वणी तालुक्यात संततधार पावसाने १६ घरांची, तर एका गोठ्याची अशंत: पडझड झाली. त्यात शिंदोला परिसरातील चनाखा येथील पाच घरे आणि एका गोठ्याची पडझड झाली. राजूर कॉलरी येथील चार घरे, भांदेवाडा येथील तीन घरे, भालर परिसरातील बेसा येथील तीन घरांचीही अंशत: पडझड झाली आहे. याशिवाय कुठेही नुकसान झाले नाही. मात्र बहुतांश शेतात आता पावसाचे पाणी शिरले आहे. त्यातच पाऊस सुरू असल्याने रविारी शेतकऱ्यांना शेतात जाणेही जमले नाही. त्यामुळे शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकरी कासावीस झाले आहेत. मारेगाव तालुक्यातही शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर आणि रविवारी दिवसभर सुरूच होता. या पावसामुळे कपाशी, सोयाबिनचे बियाणे दबण्याची भिती वर्तविली जात आहे. सोबतच अुकंरलेली दोन पानांची कपाशीची झाडे संततधार पावसाने धोक्यात सापडली आहे. गेल्या आठवडाभर मारेगाव तालुक्यात जवळपास दररोज पाऊस कोसळत आहे. २० जूनला सायंकाळी ६ वाजता तालुक्यात पावसाला सुरूवात झाली. दुसऱ्या दिवशी रविवारीही संततधार पाऊस सुरूच आहे. संततधार पावसामुळे शेतात व इतरत्र पाणीच पाणी साचले आहे. गेल्या दोन दिवसांपासून अुकंरलेले बियाणे पाण्यात सापडल्याने ते सडून मरण्याची भिती शेतकऱ्यांना सतावत आहे. शेतकरी कपाशीची पेरणी झाल्यानंतर सोयाबिनची पेरणी करतात. सध्या सर्वत्र सोयाबिनची पेरणी सुरू होती. पेरणी केलेल्या सोयाबिनवर संततधार पाऊस झाल्याने पेरलेले बियाणे जमिनीतच दबण्याची भितीही निर्माण झाली आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील कोरडे पडलेले नाले, विहीर यांच्या पाणी पातळीत मात्र वाढ झाली आहे. पांढरकवडा तालुक्यात जोरदार पाऊस बरसलातालुक्यात शनिवारपासून जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले आहे. आजपर्यंत तालुक्यात तब्बल १८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी तालुक्यातील खुनी व पैनगंगा या नद्या दुथडी भरून वाहात होत्या. पीक पेरणीस अनुकूल ठरलेल्या या पावसामुळे बळीराजा समाधानी आहे. तालुक्यात वेळीच वरूण राजाचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. आणखी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही, ते शेतकरीही पेरणी उरकण्याच्या मार्गावर आहे. शनिवारी तालुक्यात ८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या १७ जूनला रात्री २५ मिलीमीटर पाऊस झाला. इतर दिवशी रात्री तुरळक पावसाची नोंद झाली आहे. झरी तालुक्यात १४८ मिलीमीटरझरी - शनिवारी मध्यरात्री तालुक्यात पावसाला तालुक्यात सुरूवात झाली. हा पाऊस रविवारी सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरूच होता. तालुक्यात आजपर्यंत १४८ मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे तेलंगणा व महाराष्ट्राच्या सिमेजवळून वाहणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. शनिवारी रात्रीपासूनच पावसामुळे वीज गुल झाली होती. ती रविवारीही परतली नव्हती. वृत्तलिहिस्तोवर वीज परतली नसल्याने तालुक्यातील ग्रामस्थ संतापले होते. (लोकमत चमू)