शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पावसानं ईचीन कहरच केला, बुढा वाहूनच गेला तरी टणटण राहिला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 5:00 AM

पिंपळगाव परिसरातील कुंदन चौकात राहणारे सहदेवराव यांचा एकूणच किस्सा मजेदार आहे. दररोज दारू पिणे हा त्यांचा दिनक्रम आहे. दारू एकदा अंगात शिरली की सिनेमातील इन्स्पेक्टर, खलनायक, अभिनेता असे विविध नट त्यांच्या अंगात शिरतात आणि मग सुरू होतो पिक्चर. असाच दारू ढोसल्यानंतर रविवारी रात्रीही सहदेवरावांची डायलॉगबाजी सुरू होती. दारूच्या नशेत बडबडत घराकडे जाताना तोल जाऊन ते नालीत पडले.

ठळक मुद्देदेव तारी त्याला कोण मारी’ : १४ तास नाल्याच्या पुरात फसूनही वाचला, पिंपळगावातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ७० वर्षांचा जख्ख म्हातारा दारू ढोसून टुन्न झाला... रात्री जोरदार पावसादरम्यान नालीत वाहून गेला. एका ठिकाणी जाऊन फसला. सकाळपर्यंत निपचित पडून राहिला. लोकांना वाटले बुढा मेला... पण लोक जवळ जाताच बुढा उठला अन् ताडकन् म्हणाला, ‘कोई कुछ नही बोलेगा, सिर्फ मै बोलुंगा..!’‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय देणारी ही घटना यवतमाळ शहरातील पिंपळगाव परिसरात घडली. १२ ते १४ तास नाल्यात भर पावसात फसून राहिलेला ७० वर्षीय म्हातारा वाचला. सहदेवराव नंदे असे या व्यक्तीचे नाव आहे.पिंपळगाव परिसरातील कुंदन चौकात राहणारे सहदेवराव यांचा एकूणच किस्सा मजेदार आहे. दररोज दारू पिणे हा त्यांचा दिनक्रम आहे. दारू एकदा अंगात शिरली की सिनेमातील इन्स्पेक्टर, खलनायक, अभिनेता असे विविध नट त्यांच्या अंगात शिरतात आणि मग सुरू होतो पिक्चर. असाच दारू ढोसल्यानंतर रविवारी रात्रीही सहदेवरावांची डायलॉगबाजी सुरू होती. दारूच्या नशेत बडबडत घराकडे जाताना तोल जाऊन ते नालीत पडले. पावसामुळे तुडूंब भरलेल्या मोठ्या नालीत ते वाहात गेले. एका ठिकाणी रपट्याजवळ (छोटा पूल) अडकले. पाऊस सुरूच असल्यामुळे आणि रात्री सामसूम असल्यामुळे या घटनेची कुणालाही खबर नव्हती. दारूच्या नशेत टुन्न असलेले सहदेवराव रात्रभर थंडगार पाण्यात पडून राहिले.सकाळी काही जणांच्या निदर्शनास हा प्रकार आला. हा ७० वर्षीय म्हातारा थंडगार पाण्याने मरण पावला असावा, असा सर्वांचा ग्रह झाला. कारण याच परिसरात अशाच पद्धतीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या झाली होती. पण अचानक नालीतून आवाज आला ‘लक्ष्मी पांघरुण टाक, मले थंडी लागत हाय’ हे वाक्य ऐकून तर परिसरात आणखीच भीती निर्माण झाली. परंतु काही तरुणांनी हिमत करून मृतदेह बाहेर काढण्याचे ठरवले. पण अचानक सहदेवरावच्या अंगात पुन्हा सिनेमातील खलनायक शिरला आणि डायलॉग सुरू झाला ‘कोई कुछ नही बोलेगा, सिर्फ मै बोलुंगा..!’रात्रभर थंडगार पाणी, त्यातही वय ७० वर्ष, नाल्याच्या पाण्यातील विंचू-सापांची भीती. असे असतानाही सहदेवराव वाचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यवतमाळचेच कवी शंकर बडे यांची ‘पावसानं ईचीन कहरच केला, लोकं म्हणे नागो बुढा वाहूनच गेला’ ही प्रसिद्ध कविता या घटनेमुळे पुन्हा ताजी झाली.गावकरी म्हणाले, हा तर आपला इन्स्पेक्टरया अजब व्यक्तिमत्त्वाचे खरे नाव सहदेवराव नंदे असले तरी त्यांच्या अजबगजब सवयींमुळे ते ‘सीआयडी इन्स्पेक्टर’ म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. रविवारी रात्रभर पाण्यात अडकून सोमवारी सकाळी लोकांना जेव्हा हा म्हातारा गवसला, तेव्हा लोकांनाही आपला इन्स्पेक्टर असा कसा फसला याबाबत नवल वाटले.सहदेवराव नंदे हे या परिसरातील सर्वपरिचित व्यक्ती आहे. त्यांचा बोलका स्वभाव ठाऊक असल्याने सारेच त्यांच्या मदतीला धावून गेले. मोठ्या प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यासाठी पिंपळगाव परिसरातील नागरिकांनी माणुसकीच्या नात्याने धावपळ केली.- नितीन माटेसामाजिक कार्यकर्ते, पिंपळगाव