शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पावसान ईचीन कहरच केला, बुढा वाहूनच गेला तरी टणटण राहिला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 14:06 IST

देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना यवतमाळ शहरातील पिंपळगाव परिसरात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ७० वर्षांचा जख्ख म्हातारा दारू ढोसून टुन्न झाला... रात्री जोरदार पावसादरम्यान नालीत वाहून गेला. एका ठिकाणी जाऊन फसला. सकाळपर्यंत निपचित पडून राहिला. लोकांना वाटले बुढा मेला... पण लोक जवळ जाताच बुढा उठला अन् ताडकन् म्हणाला, कोई कुछ नही बोलेगा, सिर्फ मै बोलूंगा..!देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय देणारी ही घटना यवतमाळ शहरातील पिंपळगाव परिसरात घडली. १२ ते १४ तास नाल्यात भर पावसात अडकून राहिलेला ७० वर्षीय म्हातारा वाचला. सहदेवराव नंदे असे या व्यक्तीचे नाव आहे.पिंपळगाव परिसरातील कुंदन चौकात राहणारे सहदेवराव यांचा एकूणच किस्सा मजेदार आहे. दररोज दारू पिणे हा त्यांचा दिनक्रम आहे. दारू एकदा अंगात शिरली की सिनेमातील इन्स्पेक्टर, खलनायक, अभिनेता असे विविध नट त्यांच्या अंगात शिरतात आणि मग सुरू होतो पिक्चर. असाच दारू ढोसल्यानंतर रविवारी रात्रीही सहदेवरावांची डायलॉगबाजी सुरू होती. दारूच्या नशेत बडबडत घराकडे जाताना तोल जाऊन ते नालीत पडले. पावसामुळे तुडूंब भरलेल्या मोठ्या नालीत ते वाहात गेले. एका ठिकाणी रपट्याजवळ (छोटा पूल) अडकले. पाऊस सुरूच असल्यामुळे आणि रात्री सामसूम असल्यामुळे या घटनेची कुणालाही खबर नव्हती. दारूच्या नशेत टुन्न असलेले सहदेवराव रात्रभर थंडगार पाण्यात पडून राहिले.

सकाळी काही जणांच्या निदर्शनास हा प्रकार आला. हा ७० वर्षीय म्हातारा थंडगार पाण्याने मरण पावला असावा, असा सर्वांचा ग्रह झाला. कारण याच परिसरात अशाच पद्धतीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या झाली होती. पण अचानक नालीतून आवाज आला लक्ष्मी पांघरुण टाक, मले थंडी लागत हाय हे वाक्य ऐकून तर परिसरात आणखीच भीती निर्माण झाली. परंतु काही तरुणांनी हिमत करून मृतदेह बाहेर काढण्याचे ठरवले. पण अचानक सहदेवरावच्या अंगात पुन्हा सिनेमातील खलनायक शिरला आणि डायलॉग सुरू झाला कोई कुछ नही बोलेगा, सिर्फ मै बोलूंगा..!

रात्रभर थंडगार पाणी, त्यातही वय ७० वर्ष, नाल्याच्या पाण्यातील विंचू-सापांची भीती. असे असतानाही सहदेवराव वाचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यवतमाळचेच कवी शंकर बडे यांची पावसानं ईचीन कहरच केला लोकं म्हणे नागो बुढा वाहूनच गेला ही प्रसिद्ध कविता या घटनेमुळे पुन्हा ताजी झाली.हा तर सीआयडी इन्स्पेक्टर !या अजब व्यक्तिमत्त्वाचे खरे नाव सहदेवराव नंदे असले तरी त्यांच्या अजबगजब सवयींमुळे ते सीआयडी इन्स्पेक्टर म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. रविवारी रात्रभर पाण्यात अडकून सोमवारी सकाळी लोकांना जेव्हा हा म्हातारा गवसला, तेव्हा लोकांनाही आपला इन्स्पेक्टर असा कसा फसला याबाबत नवल वाटले. मात्र यवतमाळात लॉकडाऊन असतानाही या इसमाला दारू कुठून उपलब्ध झाली, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके