शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बियाण्यांविरुद्ध तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

३१ मे रोजी जिल्ह्यात पाऊस बरसला. सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली. ११, १२, १३ आणि १५ जूनला पाऊस बरसला. यानंतर पावसाने उघडीप दिली. यानंतर पेरणीच्या कामाला चांगलाच वेग आला. ७२ टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र पेरणी केलेले सोयाबीनचे सर्टिफाईड बियाणे उगवलेच नाही. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांनी याची तक्रार केली आहे.

ठळक मुद्देसोयाबीनच्या ५४९ तक्रारी : दहा हजार हेक्टरवर दुबार पेरणीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस बियाणे आणि अपुरा पाऊस यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवलेच नाही. यामुळे जिल्ह्यातील दहा हजार हेक्टर क्षेत्राला दुबार पेरणी करावी लागणार आहे. बियाणे उगवलेच नाही याच्या ५४९ तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. तक्रारीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उमरखेड तालुक्यातून सर्वाधिक तक्रारी आहेत.३१ मे रोजी जिल्ह्यात पाऊस बरसला. सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली. ११, १२, १३ आणि १५ जूनला पाऊस बरसला. यानंतर पावसाने उघडीप दिली. यानंतर पेरणीच्या कामाला चांगलाच वेग आला. ७२ टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र पेरणी केलेले सोयाबीनचे सर्टिफाईड बियाणे उगवलेच नाही. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांनी याची तक्रार केली आहे.सदोष बियाणे असल्याने उगविलेच नाही. दमदार पाऊस होऊनही केवळ बियाण्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. काही कंपन्याच्या सर्टीफाईड बियाण्यात कचरा, खडे, गोटे, आणि कीड लागले दाणे आढळून आले. राज्य बियाणे गुणवत्ता नियंत्रण विभागाने निकृष्ट बियाण्याला मान्यता दिली कशी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उगवण शक्ती नसलेले बियाणे कंपन्यानी शेतकऱ्यांच्या माथी मारले. पेरणी झाल्यावर लगेच पाऊस बरसल्याने बियाणे कंपन्यांचा बदमाशपणा उघड झाला आहे.आता शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्यानंतर कृषी विभागाने पेरणी झालेल्या शेतातील बियाण्याचे पंचनामे सुरू केले आहे. याशिवाय जिल्हयात प्राप्त झालेल्या बियाणे कंपन्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. हा अहवाल मिळाल्यानंतरच कृषी विभाग सदोष बियाणे विकणाऱ्या कंपन्या विरोधात कारवाईचे पाऊल उचलणार आहे. मात्र या शासकीय सोपस्कारातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच येणार नाही. असा पूर्वानुभव असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. कंपन्या न्यायालयीन प्रक्रियेत दिवस काढतात. शेतकऱ्यांला आर्थिक फटका सोसून दुबार पेरणीची तयारी करावीच लागते.महाबीज देणार दुबार पेरणीला बियाणे१२ कंपन्याचे बियाणे उगवले नाही अशा आहेत. यामध्ये महाबिज कंपनीने त्यांच्या बियण्यासंदर्भातील तक्रारीची दखल घेतली आहे. अशा तक्रारीत शेतकºयांना सोयाबीनची पर्यायी बियाणे तत्काळ देण्याचे आदशे महाबीजचे अपर सचिव उमेश चांदिवडे यांनी काढले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीMahabeejमहाबीज