शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

यवतमाळसह जिल्ह्यात पाऊस व गारांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:43 IST

शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला. सलग दुसऱ्या दिवशीही निसर्गाचा प्रकोप कायम असल्याने शेतकरी हादरले आहे.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान : दुसऱ्या दिवशी आसमानी संकट कायम

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला. सलग दुसऱ्या दिवशीही निसर्गाचा प्रकोप कायम असल्याने शेतकरी हादरले आहे. यवतमाळ शहरातील गोधणी मार्गावर गारांची चादर पडली होती. सर्वाधिक नुकसान महागाव तालुक्यातील मुडाणा, बिजोरा परिसरात झाले असून जोरदार पावसाने नाल्याला पूर आला होता.रविवारी यवतमाळ जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. सोमवारी सकाळी स्वच्छ उन्ह निघाले होते. मात्र दुपारच्यानंतर अचानक ढगाळ वातावरण होऊन सायंकाळी वादळी वाºयाला प्रारंभ झाला. यवतमाळ शहरात ५ वाजताच्या सुमारास बोराच्या आकाराच्या गारा कोसळल्या. कळंब चौक, गांधी चौक, एलआयसी चौक, बसस्थानक, गोधनी रोड परिसर यासह शहराच्या पूर्व भागात गारांचा वर्षाव झाला. तर सुमारे अर्धा तास पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला. हुडहुडी भरणारी थंडी निर्माण झाली.वादळी पावसाचा सोमवारी सर्वाधिक तडाखा महागाव तालुक्याला बसला. बिजोरा, राजुरा, घानमुख, कोठारी, बेलदरी परिसरात ५ वाजताच्या सुमारास बोराच्या आकाराची गारपीट झाली. या गारांचा शेतात थर साचला होता.यामुळे गहू, हरभरा यासह कोबी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील गहू तर भूईसपाट झाला होता. फुलसावंगी परिसरालाही वादळाने चांगलाच तडाखा दिला. वडद, मुडाणा येथे ५.३० वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तसेच जोरदार गारपीट झाली. शेतातील उभे पीक नष्ट झाले. महागाव तालुक्यात रविवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने १७ हजार हेक्टरवरील हरभरा पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या शेतकऱ्यांनी हरभऱ्याची काढणी केली आहे. परंतु या पावसाने हा हरभरा मातीमोल झाला.पांढरकवडा तालुक्यातील रुंझा परिसरालाही पावसाने झोडपून काढले. पाथरी गावाजवळ मोठा वृक्ष उन्मळून पडल्याने यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. कळंब येथे सायंकाळी ७ वाजतापासून गारांसह जोरदार पाऊस झाला. नेर तालुक्यालाही वादळी पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील सोनखास परिसरात आवळ्याच्या आकाराची गार कोसळली. तर मालखेड परिसरात वादळामुळे मोठ्ठाले वृक्ष उन्मळून पडले. घुई येथे झालेल्या प्रचंड वादळाने अनेक घरांवरील टीनपत्रे उडाली तर विजेचे खांबही उन्मळून पडले. राळेगाव तालुक्यालाही गारांनी तडाखा दिला. तर वडकी परिसरात मोठे नुकसान झाले आहे. उमरखेड तालुक्यातील लोरा, कारखेड, देवसरी या भागात काही प्रमाणात गार आणि पाऊस झाला. तर पोफाळी, पळशी, कुपटी या ठिकाणी वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दारव्हा तालुक्यातील फुबगाव परिसरात सायंकाळी गारपीट झाली. तर घाटंजी तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. मारेगाव तालुक्यात सायंकाळी प्रचंड गारपीट झाली. खैरगाव बुटी, टाकळी, केगाव, बोदाड, गाडेगाव, चिंचमंडळ, बोरी बु., मजरा, कोथुरला, महादापेठ, दापोरा, रामेश्वर, कुंभा, शिवणी येथे जोरदार गारपीट झाली.यवतमाळात अचानक आलेल्या पावसाने मजुरांचे हाल केले. रस्त्याच्या कामाकरिता आलेल्या मजुरांच्या झोपड्या वाºयाने उडून गेल्या. यामुळे मजुरांना ऐनवेळी दुसरीकडे आसरा शोधत धाव घ्यावी लागली. शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांनाही या वादळी पावसाचा फटका बसला. महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या सभामंडपालाही याचा फटका बसला. यवतमाळच्या रोटरी महोत्सवातही गारांसह झालेल्या पावसाने धावपळ उडाली.४३ मिमी पावसाची नोंदयवतमाळ जिल्ह्यात गत दोन दिवसात ४३ मिमी पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याने घेतली. यवतमाळ शहरात एक मिमी, पुसद एक मिमी, नेर १८ मिमी, वणी २ मिमी, पांढरकवडा १६ मिमी तर मारेगावमध्ये पाच मिमी पाऊस झाला.प्रशासनाचा सतर्कतेचा इशारापुढील २४ तासात दक्षीण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही ठिकाणी गारपीट आणि पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेतकºयांनी कापलेले पीक सुरक्षित स्थळी ठेवावे, शेत आणि धान्याची काळजी घ्यावी, वीज चमकताच झाडाचा आसरा टाळावा, गरज भासल्यास ०७२३२-२४०७२० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.बाभूळगावच्या गारपिटीत शेकडो पक्षी मृत्यूमुखीबाभूळगाव : तालुक्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या गारपीटीत शेकडो पक्षांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले. पोपट, चिमण्या, मैना आदी प्राणी गारांच्या वर्षावात मृत्युमुखी पडले. तालुक्यातील करळगाव, कृष्णापूर, पाचखेड, सौजना, सिंधी, घारफळ, परसोडी परिसरात पावसासह गार कोसळली.