शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

पाण्यासाठी पालिकेत राडा

By admin | Updated: May 24, 2017 00:33 IST

महिनाभरापासून पाठपुरावा करूनही टँकर दिला जात नसल्याने शिवसेना नगरसेविकेच्या पतीने मंगळवारी यवतमाळ नगरपरिषद

सेना नगरसेविकेच्या पतीकडून तोडफोड : महिनाभरापासून टँकर नाही लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : महिनाभरापासून पाठपुरावा करूनही टँकर दिला जात नसल्याने शिवसेना नगरसेविकेच्या पतीने मंगळवारी यवतमाळ नगरपरिषद कार्यालयात तोडफोड केली. या घटनेनंतर पालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. सायंकाळी या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला. यवतमाळ शहर व लगतच्या ग्रामीण वस्त्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हद्दवाढीमुळे नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या या वस्त्या आता पाण्यासाठी पूर्णत: पालिकेवर अवलंबून आहे. पूर्वी ग्रामपंचायत असल्याने त्यांना तत्काळ मदत मिळत होती. परंतु आता त्यांना नगरपरिषदेमध्ये येरझारा माराव्या लागतात. लोहारा येथील शिवसेनेच्या नगरसेविका चैताली बेलोकार यांचे पती नीलेश शिवसेनेचे पदाधिकारी आहे. त्यांनी आपल्या भागातील नागरिकांसाठी महिनाभरापासून नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे टँकरची मागणी नोंदविली होती. शिवाय त्या परिसरातील विहिरीत असलेला गाळ उपसून तेथे मोटरपंप बसवावा, अशी त्यांची मागणी होती. परंतु या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले. गेल्या महिनाभरापासून त्यांना वेगवेगळ्या तारखा दिल्या जात होत्या. मंगळवारी ते पुन्हा पाणीपुरवठा विभागात पोहोचले. मात्र यावेळी विभाग प्रमुख उपस्थित नव्हते. पर्यवेक्षकांना जाब विचारला असता त्यांच्यात वाद झाला. त्यातूनच नीलेश बेलोकार यांनी पाणीपुरवठा विभाग प्रमुखाच्या टेबलवरील काच फोडून संगणकाची तोडफोड केली. त्यामुळे नगरपरिषदेत काही काळ तणाव निर्माण झाला होता. कर्मचाऱ्यांनीही आंदोलनाचे हत्त्यार उपसले होते. या प्रकरणी पर्यवेक्षक हरिभाऊ उईके यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भादंवि ३५३, ४२७, ५०६ कलमान्वये गुन्हा नोंदविला. नगरपरिषदेतील तोडफोडीच्या या घटनेने शहरातील भीषण पाणीटंचाईचे वास्तव पुन्हा एकदा उघड केले आहे. विशेष असे, या तोडफोडप्रकरणी तक्रार देण्याची यंत्रणेची मानसिकता नव्हती. मात्र, भाजपाकडून त्यांना तक्रारीसाठी उभे केले गेल्याचे सांगितले जाते. यापूर्वी यापेक्षाही गंभीर स्वरूपाची प्रकरणे पालिकेत घडली, यंत्रणेतील काहींना मारहाण झाली. मात्र, त्यावेळी तक्रार होणार नाही याची दक्षता राजकीयस्तरावर घेतली गेली होती. यावेळी मात्र त्याच्या उलट ‘सल्ला’ यंत्रणेला दिला गेला. राजकीय वादात विकास खुंटला यवतमाळ नगरपरिषदेचे अध्यक्षपद शिवसेनेकडे, तर बहुमत भाजपाकडे आहे. या दोन्ही पक्षांत एकमत नसल्याने विकासाचे विषय मार्गी लागलेले नाही. चेंबरसारख्या क्षुल्लक बाबींवरून सभा उधळल्या जात आहेत. पर्यायाने विकासाला ब्रेक लागला आहे. नगराध्यक्ष सेनेचा असला तरी पालिका प्रशासन व यंत्रणेचा कल हा भाजपाकडे अधिक आहे. भाजपाच्या इशाऱ्यावर पालिकेचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे सेनेने मांडलेल्या प्रस्तावात खोडा घालण्याचा प्रयत्न भाजपाकडून होताना दिसतो आहे. पाणीटंचाई व त्याच्या निवारणासाठी लावलेले जाणारे टँकर यातही राजकारण शिरले आहे. जाणीवपूर्वक टँकर पाठविले जात नाही. त्यातही सेना नगरसेवकांच्या कार्यक्षेत्रात त्याची अडवणूक केली जाते. या माध्यमातून नगराध्यक्षांना जनतेच्या नजरेत बदनाम करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. भाजपाकडूनही नगराध्यक्ष विकास कामात सहकार्य करीत नसल्याचा सूर ऐकायला मिळतो आहे. या राजकीय भांडणात नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे, ऐवढे निश्चित! ‘लोकमत’ने मांडली भीषणता यवतमाळ शहर तसेच हद्दवाढीने पालिकेत समाविष्ट झालेल्या वडगाव, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, भोसा, उमरसरा या प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. ‘लोकमत’ने त्या-त्या भागात प्रत्यक्ष भेटी देवून पाणीटंचाईचे वास्तव उघड केले होते. या पाणीटंचाईमुळे ठिकठिकाणी भांडणे होत असल्याची, तणाव निर्माण होण्याची व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. ही भीती मंगळवारच्या नगरपरिषदेतील तोडफोडीच्या घटनेने अधोरेखीत झाली आहे. शहरातील प्रत्येक भागाला एक टँकर पुरविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. तीनवेळा निविदा बोलवूनही प्रतिसाद मिळाला नाही. कालावधी वाढविल्यानंतर दोन निविदा आल्या. यातील कमी दराची निविदा उघडून मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवणार आहे. - सुदाम धुपे मुख्याधिकारी शहरातील संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले होते. मात्र वेळेत कारवाई झाली नाही. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला. टँकरचे दर शासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. त्या दरानुसार टँकर लावल्यास निविदा प्रक्रियेची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र त्यानंतरही वेळकाढू धोरण अवलंबिले जात आहे. यातूनच शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा विभाग आणि खुद्द मुख्याधिकारी टंचाईकाळात सुटीवर गेले. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना माघारी बोलाविले. - कांचन चौधरी नगराध्यक्ष, यवतमाळ