शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

बनावट कागदपत्रावर प्रमाणपत्र बनविणारे रॅकेट

By admin | Updated: September 17, 2015 03:09 IST

बनावट कागदपत्राच्या आधारे महा ई-सेवा केंद्रातून प्रमाणपत्र बनविणारे रॅकेट पुसद तालुक्यात सक्रिय असल्याची माहिती

दोघांविरुद्ध गुन्हा : वेणीच्या महा ई-सेवा केंद्रातील प्रकारपुसद : बनावट कागदपत्राच्या आधारे महा ई-सेवा केंद्रातून प्रमाणपत्र बनविणारे रॅकेट पुसद तालुक्यात सक्रिय असल्याची माहिती असून तालुक्यातील वेणी (खु) येथील महा ई-सेवा केंद्रावरून दोघांनी बनावट कागदपत्रावरून अधिवास प्रमाणपत्र तयार केल्याचे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी नायब तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नागरिकांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध व्हावी, त्वरित प्रमाणपत्र मिळावे यासाठी गत दोन वर्षांपासून ग्रामीण भागात महा ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. पुसद तालुक्यात जवळपास ५० च्या आसपास महा ई-सेवा केंद्र आहेत. मात्र आता महा ई-सेवा केंद्रांवर बनावट कागदपत्रे सादर करून प्रमाणपत्र मिळविणारे रॅकेट सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. तालुक्यातील वेणी(खु) येथील एका महा ई-सेवा केंद्रातून दोन तरुणांनी अधिवास प्रमाणपत्र तयार करून घेतले. यासाठी त्यांनी रेशन कार्ड आणि निवडणूक आयोगाचे ओळखपत्र सादर केले होते. संबंधित ई-सेवा केंद्राने सदर कागदपत्रे तपासणीसाठी पुसदच्या तहसील कार्यालयात पाठविले. त्यावेळी नायब तहसीलदार नामदेव इसलकर यांनी तपासणी केली असता रेशन कार्ड आणि निवडणूक आयोगाचे ओळखपत्र बनावट असल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत सदर ई-सेवा केंद्रातून प्रमाणपत्र दोघे जण घेऊन गेले होते. याप्रकरणी नायब तहसीलदारांनी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून आजीम गाजी मजेद गाजी व हबीब शेख रूबल शेख दोघेही रा.अमराईपुरा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या दोघांच्या प्रमाणपत्रावर १६ आॅगस्ट रोजी प्रमाणपत्र नेल्याचे निदर्शनास आले. ही गंभीर बाब तहसीलदार भगवान कांबळे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. पुसद तालुक्यात असे प्रमाणपत्र तयार करणारे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे. संबंधित तरुणांचा शोध पोलीस घेत असून वृत्त लिहिस्तोवर या दोघांचाही थांगपत्ता लागला नव्हता. या प्रकाराने तहसील वर्तूळात खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)