शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

घाटंजी येथील शासकीय वसतिगृहातील प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: August 25, 2016 01:47 IST

येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील प्रश्न ऐरणीवर आले आहे.

विद्यार्थ्यांची गैरसोय : आवश्यक सोयीसुविधांचा प्रचंड अभावघाटंजी : येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील प्रश्न ऐरणीवर आले आहे. संबंधित प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. भोजन व नाश्ता मिळत नसल्याने विद्यार्थी दोन दिवसांपासून उपाशी असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनातील वरिष्ठांचा या वसतिगृहातील समस्यांकडे कानाडोळा सुरू आहे. विद्यार्थ्यांना योग्य त्या सोयीसुविधा पुरविल्या जात नाही. शिवाय भोजन दर्जेदार मिळत नाही. नियमानुसार नाश्ता, चहा यासह भोजनामध्ये ठरवून दिलेले पदार्थ मिळत नाही. वसतिगृहाशी संबंधित काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही सहकार्य मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. दरम्यान, या वसतिगृहातील दोन स्वयंपाकी महिलांना कामावरून कमी करण्यात आले. भोजन दर्जेदार केल्याच्या कारणावरून त्यांना कमी केल्याचे सांगितले जाते. या महिलांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी आहे. वसतिगृहातील अनागोंदीसंदर्भात तहसीलदार राजपुरे यांना मंगळवारी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद आणि विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले. याची दखल घेत तहसीलदार राजपुरे आणि नायब तहसीलदार गजभिये यांनी वसतिगृहाला भेट दिली. कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना वसतिगृह प्रशासनाला देण्यात आल्या. (प्रतिनिधी)