शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख शेतकऱ्यांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 21:38 IST

जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्रातील कपाशीवर बोंडअळीने हल्ला केल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमाच काढला नसल्याने त्यांना मदत मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपीक विम्याकडे पाठ : बोंडअळीचे नुकसान भरून निघणे कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्रातील कपाशीवर बोंडअळीने हल्ला केल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमाच काढला नसल्याने त्यांना मदत मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.खरीप हंगामात नऊ लाख हेक्टरवर लागवड झाली. यात चार लाख ५६ हजार हेक्टरवर कपाशी होती. जवळपास सव्वा दोन लाख शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली. मात्र कपाशी पिकाला विम्याचे संरक्षण देण्यासाठी केवळ ६३ हजार शेतकरी पुढे आले. त्यांनी कापसाला संरक्षित करण्यासाठी १४ कोटी रूपयांचे प्रिमियम भरले. मात्र इतर दीड लाख शेतकऱ्यांना पिकाचा विमाच उतरविता आला नाही. यामुळे नुकसानीपोटी मिळणारी आठ हजारांची मदत त्यांना मिळणे दुरापास्त होणार आहे.दरम्यान, जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीने कपाशीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून तक्रारी मागविण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील चार लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित झाले आहे. तथापि जिल्ह्यातील केवळ ३७ हजार शेतकऱ्यांनीच याबाबत जी आणि एच फॉर्ममध्ये तक्रारी दाखल केल्या. इतर शेतकऱ्यांचेही नुकसान झाले. मात्र त्यांनी तक्रारीच दाखल केल्या नाहीत. काह शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. मात्र त्यासोबत बियाणे खरेदीची पावती जोडली नाही. काहींनी जी आणि एच फॉर्ममध्ये तक्रारी केल्या नाहीत. असे शेकतरी आता मदतीसाठी अपात्र ठरण्याचा धोका आहे.बियाणे खरेदीच्या पावत्याच नाहीतबोंडअळीने नुकसान झाल्याने शेतकरी त्रस्त आहे. कपाशीच्या वाणाला दोष देत आहेत. मात्र बियाणे कंपन्या न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. कंपन्या न्यायालयात गेल्यास शेतकरी अडचणीत येणार आहे. कारण अनेक शेतकऱ्यांकडे बियाणे खरेदी केल्याचे पुरावे नाहीत. अनेकांनी पावत्या जपून ठेवल्या नाही. त्यामुळे त्यांना मदत मिळेल किंवा नाही, हे सांगणे कठीण झाले आहे.सर्वच क्षेत्रात नुकसान झाले. मात्र शेतकºयांच्या मोजक्याच तक्रारी आल्या आहेत. शेतकºयांनी जी आणि एच फॉर्ममध्ये नुकसानीच्या तक्रारी दाखल कराव्या. त्यासाठी कोणतीही मुदत नाही. विमा न उतरविणाºया शेतकºयांबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.- किशोर तिवारीअध्यक्ष, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन