शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

साखर कारखान्याच्या जुन्या कामगारांचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: April 8, 2016 02:24 IST

तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्याचा ताबा नॅचरल शुगर कंपनीने घेतला आहे.

नॅचरल शुगरचा ताबा : कामगार आणि कुटुंब सैरभैरमहागाव : तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्याचा ताबा नॅचरल शुगर कंपनीने घेतला आहे. हा कारखाना सुरू होणार म्हणून जुन्या कामगारांमध्ये आनंदाची लाट निर्माण झाली. परंतु अद्यापही एकाही जुन्या कामगाराला कारखान्यावर घेतले नाही. त्यामुळे जुन्या कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना राज्य बँकेने नुकताच विकला. हा कारखाना नॅचरल शुगर कंपनीने विकत घेतला. कारखाना सुरू होणार असल्याने जुन्या कामगारांच्याही आशा पल्लवीत झाल्या. मात्र या कारखाना प्रशासनाने उस्मानाबादवरून कामगार आणले आहे. या कामगारांची राहण्याची व्यवस्था गुंज वसाहतीत करण्यात आली. त्यामुळे पूर्वी येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवासस्थान खाली करून घेण्यासाठी सक्ती होवू लागली. या सर्व कामगारांनी नॅचरल शुगर कंपनीच्या चेअरमनकडे कामावर सामावून घेण्याची मागणी केली. आम्ही कारखाना निर्मितीपासून अल्प पगारावर कामावर आहोत. कुटुंबाचे हाल होत आहे. उपासमारीची पाळी आली आहे, असे कामगारांनी सांगितले. त्यातच नॅचरल शुगरने कर्मचारी भरती सुरू केल्याने जुने कर्मचारी हादरून गेले. अनुभव असूनही रोजगार मिळत नसल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. ऊस उत्पादकांना न्याय मिळावा, बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी पुष्पवंती साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर पुष्पवंतीचे नामकरण सुधाकरराव नाईक करण्यात आले. आता हा फलक येथील राजकारण्यांच्या अपयशामुळे पुसला गेला. हा कारखाना प्रा.लि. कंपनीने विकत घेतला आणि त्यांचा स्वतंत्र कारभार सुरू झाला. यातच या कारखान्याच्या भविष्याची झलक दिसत आहे. त्यांना येथील कामगार आणि ऊस उत्पादकांचे देणे-घेणे नसून केवळ व्यापारी म्हणून ते आल्याचा सूर कामगारात दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)