शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम समाजाचे प्रश्न राज्यपालांच्या दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 22:07 IST

अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या प्रश्नांकडे विद्यमान सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. या समाजाच्या शैक्षणिक आरक्षणाचीही अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही.

ठळक मुद्देख्वाजा बेग यांचे निवेदन : शैक्षणिक आरक्षण अंमलबजावणीस टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या प्रश्नांकडे विद्यमान सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. या समाजाच्या शैक्षणिक आरक्षणाचीही अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. हा विषय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार ख्वाजा बेग यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे मांडला आहे.अल्पसंख्याक समाजास नोकरीत तसेच शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश मिळण्यासाठी सन २०१४ मध्ये तत्कालीन आघाडी शासनाने आरक्षण लागू केले. मात्र पुढील काळात तसेच सद्यस्थितीतील शासनाने न्यायालयाकडे योग्य तो पाठपुरावा केला नाही. दरम्यान, न्यायालयाने नोकरीतील आरक्षण वगळून शैक्षणिक आरक्षणास संमती दर्शविली. यानंतरही शासन मुस्लीम समाजाला शैक्षणिक आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करीत आहे. हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पत्र, अधिवेशनात चर्चा, तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, अल्पकालीन चर्चा आदी माध्यमातून रेटण्यात आला. यानंतरही शासनाने कारवाई केली नाही. उच्च न्यायालयाने संमती दर्शविलेल्या आरक्षणाचा लाभ मुस्लीम समाजाला मिळावा, असे ख्वाजा बेग यांनी या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Khwaja Baigख्वाजा बेगMuslimमुस्लीम