शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

पुसदमध्ये फोफावतेय सावकारी

By admin | Updated: June 2, 2015 23:59 IST

शहरासह तालुक्यात गत काही वर्षांपासून अवैध सावकारी फोफावली असून शेतकऱ्यांसोबतच कर्मचारी आणि कष्टीकरी

पोलिसांचे दुर्लक्ष : अव्वाच्या सव्वा व्याजाची आकारणीपुसद : शहरासह तालुक्यात गत काही वर्षांपासून अवैध सावकारी फोफावली असून शेतकऱ्यांसोबतच कर्मचारी आणि कष्टीकरी सावकाराच्या जाळ्यात अडकले आहे. आर्थिक अडचणीत असलेले सावज हेरुन त्यांची पिळवणूक केली जात आहे. अव्वाच्या सव्वा व्याजामुळे मुद्दल रक्कम परत करणेच होत नाही. यातून अनेक जण कंगाल झाल्याचे दिसत आहे. हा प्रकार खुलेआम सुरू असला तरी पोलीस मात्र सोईस्कर दुर्लक्ष करीत आहे. सततची नापिकी आणि निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. अवैध सावकार या परिस्थितीचा मोठा फायदा उठवित आहे. शेतकऱ्यांसोबतच अनेक कर्मचारी आणि झोपडपट्टीत राहणारे कामगारही या सावकाराचे सावज ठरत आहे. लहान मोठी रक्कम देऊन केवळ दरमहा व्याजाची वसुली केली जाते. वर्षानुवर्ष मुद्दल कायम राहते. पुसद शहरातील आंबेडकर वार्ड, तुकाराम बापू वार्ड, शिवाजी वार्ड, नवलबाबा वार्ड, गढी वार्ड, वसंतनगर, पार्वतीबाई नगर, इटावा वार्ड, भिल्लवाडी, महावीर नगर, संभाजीनगर यासह लगतच्या काकडदाती, लक्ष्मीनगर, धनकेश्वर, श्रीरामपूर, गायमुखनगर भागात मध्यमवर्गीय कष्टकरी व कामगारांचे प्राबल्य आहे. अशा मंडळींना नेहमी पैशाची चणचण भासते. कोणतीही स्थावर अथवा जंगम मालमत्ता नसल्याने बँका कर्ज देत नाही. तर बचत गटाच्या माध्यमातून कर्ज मिळविण्याचा प्रयत्न केला तर तेथेही उलटाच अनुभव येतो. तालुक्यातील काही बचत गट सावकारीत गुंतल्याचे दिसून येते. पुसद शहरात सध्या सेठजी, सावजी, अण्णा, मामा, नाना या टोपन नावावरून ओळखले जाणारे अवैध सावकारी गुंतले आहे. खासगी नोकरीतील तुटापुंज पगार, लग्न, शिक्षण, आजारपण आदी दैनंदिन गरजा भागविण्यासाठी कर्जासाठी या सावकाराकडे धाव घेतली जाते. या सावकारांनी मोठ्या प्रमाणात व्याज आकारुन ग्राहकांची पिळवणूक सुरू केली आहे तर काही अधिकृत सावकारही कागदोपत्री व्याजदर वेगळे आणि प्रत्यक्षातील व्याजदर वेगळे आकारताना दिसत आहे. यात सामान्य नागरिक पिळला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)वसुलीसाठी दमदाटीसावकाराचे कर्ज घेतल्यानंतर दरमहा व्याज द्यावे लागते. एक दोन महिने व्याज थकले की सावकाराचे माणसे रात्री-अपरात्री घरी येतात. शिवीगाळ करतात. धमक्या देतात यातून वसुली केली जाते. अनेकांच्या घरच्या मंडळींना तर सावकाराचे कर्ज घेतल्याची माहितीही नसते. मात्र सावकाराचे माणसे घरी पोहोचल्यावर त्याचा भंडाफोड होतो. अनेक सावकारांनी तर वसुलीसाठी खास माणसेच पोसली आहे.