शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पुसदच्या तरुणाचे दुचाकीने भारतभ्रमण; ३० दिवसांत १० राज्यातून १० हजार किमीचा प्रवास करणार

By रवींद्र चांदेकर | Updated: June 14, 2023 16:31 IST

संत सेवालाल महाराजांचा शांतीचा संदेश गावोगावी पोहोचविणार

पुसद (यवतमाळ) : तालुक्यातील शळोणा येथील एक युवक दुचाकीने भारतभ्रमण करणार आहे. तो ३० दिवसांमध्ये १० राज्यांतून तब्बल १० हजार किलोमीटरचा प्रवास करून संत सेवालाल महाराज यांचा शांती संदेश गावोगावी पोहोचविणार आहे. 

दीपक मंगल आडे (३४) असे या युवकाचे नाव आहे. ‘हिंमत हैं मर्दा, तो मदद दे खुदा’, असे म्हटले जाते. त्यानुसार या ध्येयवेड्या दीपकने बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांचा शांतीचा संदेश चोहीकडे पोहोचविण्याच्या हेतूने चक्क दुचाकीने भारतभ्रमण करण्याचा निर्णय घेतला. नुकताच ९ जूनला तो पुसद येथून अमरनाथकडे रवाना झाला. तो सर्वत्र कौतुकाचा विषय बनला आहे. दीपक ३० दिवसांत १० राज्यातून तब्बल १० हजार किलोमीटरचा प्रवास स्वतःच्या दुचाकीने करणार आहे, हे विशेष.

तालुक्यातील शिळोणा या लहानशा खेड्यातील तो रहिवासी आहे. संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे दैवत आहे. त्यांनी आपल्या हयातीत गावागावात, तांड्यातांड्यांवर जाऊन लोकांना शांती व सद्भावनेचा संदेश दिला होता. अखंड भारताचे स्वप्न बघितले होते. त्यांचा अखंड भारत व शांतीचा संदेश चोहीकडे पोहोचविण्याच्या उद्देशाने दीपक आडे दुचाकीने भारत भ्रमंतीवर निघाला आहे. तो  मंडप डेकोरेशनचे काम करतो. मात्र, ध्येयाने पछाडलेला दीपक पांढरा ध्वज घेऊन स्वतःच्या दुचाकीने पुढील एक महिना भारतभ्रमण करणार आहे. 

मेकॅनिककडून प्रेरणा, असा राहणार प्रवास

दीपक आडे पुसद येथून वाशिम, पातूर, शेगाव, मुक्ताईनगर, बुऱ्हाणपूर, ओंकारेश्वर, इंदोर, उज्जैन, निमच आदी मार्गाने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, केदारनाथ, बद्रीनाथ, अमरनाथ, राजस्थान, पंजाब, हरयाणा, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिसा, बिहार आदी १० राज्यातून प्रवास करणार आहे. येथील बंजारा कॉलनीजवळील दुचाकी मेकॅनिक हिरा कान्हेड यांच्याकडून भारत भ्रमंतीचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाल्याचे दीपक आडे यांनी सांगितले. हिरा कान्हेड हे दरवर्षी निवडक मित्रांना घेऊन दुचाकीने पर्यटन करतात. दुचाकीने एकटा भारतभ्रमंती करणाऱ्या दीपक आडे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकYavatmalयवतमाळ