शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यात ८५० शेततळे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:41 IST

तालुक्यात ८५० शेततळे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. तथापि तालुक्यातील अनेक शेतकरी अद्यापही शेततळ्याच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देअनेक शेतकरी प्रतीक्षेत : यावर्षी अडीच कोटींचा निधी मंजूर

ऑनलाईन लोकमतपुसद : तालुक्यात ८५० शेततळे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. तथापि तालुक्यातील अनेक शेतकरी अद्यापही शेततळ्याच्या प्रतीक्षेत आहे.मागेल त्याला शेततळे या योजनेनुसार शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी अनुदान दिले जाते. यातून शेतकऱ्यांना शास्वत सिंचनाची सुविधा प्राप्त होते. त्यांना दुबार पीक घेणेही शक्य होते. खरीप आणि रबी हंगामात पीक घेऊन शेतकऱ्यांना आपली आर्थिक परिस्थिती सुदृढ करता येते. हीच बाब हेरुन शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. ही योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत तालुक्यात ८५० शेततळे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभाग करीत आहे. २०१७-१८ साठी पुसद तालुक्याला जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शेततळ्यांसाठी दोन कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला.तालुक्यातील ६३ गावांमध्ये ८५० शेततळे पूर्ण झाले. मात्र अनेक गावांमध्ये कागदोपत्री शेततळे पूर्ण करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. दर १५ दिवसांनी कृषी विभाग आॅनलाईन मागणीनुसार शेततळ्यांसाठी लाभार्थ्यांची निवड करते. अंदाजपत्रक तयार करून उपविभागीय अधिकाऱ्यांची मंजुरी घेतली जाते. काम पूर्ण झाल्यावर अनुदान दिले जाते. मात्र ज्या शेतकऱ्याच्या नावावर केवळ ०.६० हेक्टर जमीन आहेत. त्यांनाच योजनेचा लाभ दिला जातो. यात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्य दिले जाते. ५० हजारांच्या अनुदानातून हे शेततळे पूर्ण करावे लागते.जलयुक्तशिवार अभियानांतर्गत तालुक्यात २०१७-१८ मध्ये खैरखेडा येथे सर्वाधिक ४८ शेततळे मंजूर झाले आहे. तथापि अनेक गावांमध्ये कागदोपत्रीच शेततळे पूर्ण झाल्याची ओरड सुरू आहे.अनुदान कमी असल्याची ओरडएक शेततळे पूर्ण करण्यासाठी किमान लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र शासनाकडून केवळ ५० हजारांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे अनुदान कमी असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी विभाग मात्र एवढ्याच अनुदानात शेततळे पूर्ण होत असल्याचा दावा करीत आहे. दरम्यान उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रकाश नाईक, तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड यांनी ८५० शेततळे पूर्ण झाल्याचा दावा केला आहे.