शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पुसद नगरपरिषदेचे ३५ कोटी ३८ लाखांचे शिलकीचे अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

भाजपचे गटनेते निखिल चिद्दरवार यांनी सत्ताधारी विकासाबाबत गंभीर नसल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप केला. या अर्थसंकल्पावरून विशेष सभेत गरमागरम चर्चा झाली. विरोधी नगरसेवकांनी कोट्यवधींचे शिलकीचे अंदाजपत्रक असताना शहराचा विकास का झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

ठळक मुद्देविकासाचा मात्र बोजवारा । सातपटींनी वाढली शिल्लक, अर्थसंकल्प मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील नगरपरिषदेच्या विशेष बैठकीत नगराध्यक्ष अनिताताई मनोहरराव नाईक यांनी २०२०-२१ या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केला. सभागृहाने ३५ कोटी ३८ लाख रुपये शिलकीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी बहाल केली.पालिकेच्या सभागृहात अंदाजपत्रक सादर करण्यासाठी शुक्रवारी विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांनी ३५ कोटी ३८ लाख ९० हजार ५८० रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकाला सभागृहाने मंजुरी प्रदान केली. मात्र भाजपच्या नगरसेविका डॉ.रूपाली जयस्वाल यांनी नगराध्यक्षांनी ३५ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला. मात्र शहराचा विकास का झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला. शिलकीच्या ३५ कोटींचे लोणचे घालणार का, असा संतप्त सवाल यांनी केला. भाजपच्या दुसऱ्या नगरसेविका अनिता चव्हाण यांनीही प्रभाग क्र.१४ मध्ये कोणतीही विकास कामे झाली नाही, असा आरोप केला.भाजपचे गटनेते निखिल चिद्दरवार यांनी सत्ताधारी विकासाबाबत गंभीर नसल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप केला. या अर्थसंकल्पावरून विशेष सभेत गरमागरम चर्चा झाली. विरोधी नगरसेवकांनी कोट्यवधींचे शिलकीचे अंदाजपत्रक असताना शहराचा विकास का झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला.विशेष म्हणजे या सभेचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारांना सभागृहात बसण्याची सत्ताधारी व विरोधकांनी तसदी घेतली नाही. नगराध्यक्ष अनिताताई यांनी यांनी अंदाजपत्रकातून पुढील आर्थिक वर्षात राबविण्यात येणाºया विविध विकास कामांची जंत्री सादर केली. मागील वर्षीच्या तुलनेत सातपटीने अधिक शिल्लक असलेला हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी पाच कोटी शिलकीचा अंदाजपत्रक सादर करण्यात आला होता. यावर्षी शिलकीत सातपटीने वाढ झाल्याचे दिसून आले.काँग्रेस नगरसेवकाचा सभात्यागकाँग्रेसचे नगरसेवक शाकीब शहा यांनी पत्रकारांना सभागृहात बसण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी थोडीही सहानुभूती दाखविली नसल्याचा आरोप करून सभात्याग करीत असल्याचे सांगितले. बैठकीत उपाध्यक्ष डॉ.अकील मेमन, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी अर्थसंकल्पातील तरतुदीची माहिती दिली. शिवसेनेचे नगरसेवक अ‍ॅड.उमाकांत पापीनवार यांनी अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाBudgetअर्थसंकल्प