शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

पुसद @ ९४ टक्के

By admin | Updated: May 28, 2015 01:59 IST

बारावीच्या परीक्षेचा तालुक्याचा निकाल ९३.७२ टक्के लागला आहे. चार शाळांनी १०० टक्के निकाल दिला असून शहरातून लोकहित ज्युनिअर कॉलेज अव्वल राहिले.

बारावीचा निकाल : चार महाविद्यालयांनी गाठली शंभरीपुसद : बारावीच्या परीक्षेचा तालुक्याचा निकाल ९३.७२ टक्के लागला आहे. चार शाळांनी १०० टक्के निकाल दिला असून शहरातून लोकहित ज्युनिअर कॉलेज अव्वल राहिले. तालुक्यातून तीन हजार २५ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील दोन हजार ८३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २८३ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी १५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यांच्या यशाची टक्केवारी ५२.४२ एवढी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर झाला. यासोबतच निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची सायबर कॅफेवर झुंबड उडाली. यशस्वी विद्यार्थी आनंदोत्सव साजरा करत होते. तालुक्यातील संभाजी पांडे ज्युनिअर कॉलेज, वसंतराव नाईक आश्रमशाळा चिखली, उच्च माध्यमिक विद्यालय घाटोडी आणि शिवाजी ज्युनिअर कॉलेज भोजलाचा निकाल १०० टक्के लागला. लोकहित ज्युनिअर कॉलेज ९८.११ टक्के निकाल देत शहरातून प्रथम स्थानी राहिले. हर्षी येथील शिवाजीराव मोघे ज्युनिअर कॉलेजचा निकाल सर्वात कमी ७३.९१ टक्के लागला आहे. पुसद तालुक्यात एकूण ३९ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यातील शहरात नऊ तर ग्रामीण भागात ३० कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. लोकहित कॉलेजमधील ५४ पैकी ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यानंतर विश्वनाथसिंह बयास नगरपरिषद ज्युनिअर कॉलेज (९७.२२), शिवाजी ज्युनिअर कॉलेज (९७.०४), जी.एन. आझाद उर्दू ज्युनिअर कॉलेज (९६.८९), को.दौ. विद्यालय (९६.२८), श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला कॉलेज (९४), वसंतराव नाईक ज्युनिअर कॉलेज (९२.७३), पी.एन. कॉलेज (८९.४१) आणि उर्दू ज्युनिअर कॉलेज (४८.८९) या शहरातील शाळा-महाविद्यालयांनी निकाल दिला आहे.तालुक्याच्या ग्रामीण भागात शिवाजी ज्युनिअर कॉलेज बेलोरा (९७.२२), शिवाजी ज्युनिअर कॉलेज जांबबाजार (९७.२२), गुणवंतराव देशमुख ज्युनिअर कॉलेज कवडीपूर (९७.६२), रामू नाईक ज्युनिअर कॉलेज वरूड (९८.५९), बाबासाहेब नाईक ज्युनिअर कॉलेज पारवा (८६.२७), अब्दुल रशीद मेमोरिअल ज्युनिअर कॉलेज शेंबाळपिंपरी (९०.२४), नामदेवराव मळघणे ज्युनिअर कॉलेज मरसूळ (९३.५२), दत्तराव देशमुख ज्युनिअर कॉलेज शेंबाळपिंपरी (८९.४७), राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज अडगाव (९५.८३), मुंगसाजी आश्रमशाळा माणिकडोह (९७.९२), सुधाकरराव नाईक ज्युनिअर कॉलेज रोहडा (८४.४४), वसंतराव पुरके ज्युनिअर कॉलेज बोरगडी (९६.८८), मनोहरराव नाईक ज्युनिअर कॉलेज लोहरा (९२), उच्च माध्यमिक विद्यालय काटखेडा (९६.९२), सुधाकरराव नाईक ज्युनिअर कॉलेज जनुना (९२.३१), जगदंबा ज्युनिअर कॉलेज शेलू (९४.२९), संत गजानन महाराज ज्युनिअर कॉलेज लाखी (९०.९१), सुधाकरराव नाईक ज्युनिअर कॉलेज काकडदाती (७८.२६), व्हीजेएन आश्रमशाळा सावरगाव(बंगला) (८७), शासकीय आश्रमशाळा हर्षी (८७.७६), जनता शिक्षण प्रसारक मंडळ ज्युनिअर कॉलेज (९४.७४) या महाविद्यालयांनी चांगला निकाल दिला आहे. आॅनलाईन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेवर मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)