शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून पूस नदी स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:27 IST

शहराची जीवनदायिनी असलेल्या पूस नदीचे अलिकडे स्वरूप कुरूप झाले आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी केरकचरा निर्माण झाला असून पाण्याचे डबके निर्माण झाल्याने दुर्गंधी सुटत आहे.

ठळक मुद्देपुसदकरांचा सहभाग : विश्रामगृहात पार पडली बैठक, नगराध्यक्षांसह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित

अखिलेश अग्रवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहराची जीवनदायिनी असलेल्या पूस नदीचे अलिकडे स्वरूप कुरूप झाले आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी केरकचरा निर्माण झाला असून पाण्याचे डबके निर्माण झाल्याने दुर्गंधी सुटत आहे. शहरासाठी महत्त्वाची असणाऱ्या या नदीचे पुरुज्जीवन करण्यासाठी पुसदकरांनी पुढाकार घेतला असून पावसाळ्यापूर्वी ही नदी लोकसहभागातून स्वच्छ केली जाणार आहे.पूस नदीच्या स्वच्छतेसंदर्भात नुकतीच विश्रामगृहावर नगराध्यक्ष अनिताताई नाईक, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांच्यासह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत पूस नदीच्या स्वच्छतेची भूमिका मांडण्यात आली. पूस नदीची लांबी वालतूर रेल्वेपासून ते दत्त खांडीपर्यंत चार किलोमीटर आहे. या भागातील स्वच्छता तसेच काही प्रमाणात खोलीकरण केल्यास नदी वाहती होईल. शिवाय परिसरातील कूपनलिका व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढू शकतो. हा प्रकल्प मोठा असून लोकसहभागातून नदीला पुरुज्जीवित करण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.या कार्यास शहरातील सामाजिक संघटनांसह नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक व श्रमदान करण्याचा पुढाकार व्यक्त केला. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे या अभियानाला सहकार्य मिळत आहे. असे असले तरी शहरातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, अधिकारी यांच्या सहकार्याची गरज आहे.पूस नदीची साफसफाई करण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्वांनी सहकार्य केले तर शहराची जीवनदायी पूस स्वच्छ आणि निर्मळ होणार यात शंका नाही.सांडपाण्यामुळे दुरावस्थापूस नदीपात्रात शहरातील सांडपाणी येते. त्यामुळे नदीपात्राला विद्रूप स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच जलपर्णीसह प्लास्टिक पिशव्यांचा खच पडला आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नदी तीरावरच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आता स्वच्छता मोहीम हाती घेतली असून यात सर्वांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे.