शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘एक टॅँकर माझ्या नावाने’च्या माध्यमातून शुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 22:11 IST

शहरात भीषण टंचाई असून गरिबांच्या वस्त्यांमध्ये पिण्यास शुद्ध पाणी नाही. दूषित पाणी पिण्यात आल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देदिलासा : आंबेडकरी साहित्य व कला अकादमी, ‘नाग’चा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात भीषण टंचाई असून गरिबांच्या वस्त्यांमध्ये पिण्यास शुद्ध पाणी नाही. दूषित पाणी पिण्यात आल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे. अशा स्थितीत आंबेडकरी साहित्य व कला अकादमी आणि नॅशनल आंबेडकराईट गार्ड (नाग) संघटनेने समाजातील दात्यांना आवाहन करून ‘एक टॅँकर माझ्या नावाने’ या उपक्रमाची सुरुवात केली. याला शहरातील आणि विदेशात स्थिरावलेल्या समाजबांधवांनी सढळ हाताने मदत केली. यातून गरीब वस्तीमध्ये दिवसाला चार हजार लिटर शुद्ध पाणी वितरित केले जात आहे.हा उपक्रम सुरू करण्यासाठी सुरुवातील अकादमीच्या सदस्यांनी स्वत:च्या खिशातून वर्गणी दिली. या उपक्रमातील सेवाभाव पाहून अनेकांनी स्वेच्छेने शक्य होईल ती रक्कम या कामात दिली. अकादमी व ‘नाग’ संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनीसुद्धा देणगी दात्याच्या नावे टॅँकरवर बॅनर लावून पाणी वाटप सुरू केले. रोजमजुरीसाठी सहकुटुंब घराबाहेर पडणाऱ्यांना टंचाईत शाश्वत पुरवठा केला जात आहे. पाटीपुरा, सम्राट अशोक चौक ते आंबेडकर चौक वस्ती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, नेताजीनगर या भागात रोटेशन पद्धतीने शुद्ध पिण्याचे पाणी देण्यात येत आहे.हा उपक्रम आनंद गायकवाड, गोपींचद कांबळे, कवडूजी नगराळे, डॉ.सुभाष जमधाडे, डॉ.साहेबराव कदम, प्रा.अ‍ॅड.संदीप नगराळे, अभियंता संजय मानकर, संजय ढोले यांच्यासह ‘नाग’ संघटनेचे रितेश मून, राहुल बनसोड, मंगला जाधव, शोभा हनवते, भारत थुल निस्वार्थ भावनेने राबवित आहेत. आनंद गायाकवाड व मालती गायकवाड या दाम्पत्यांनी तर पाणी वाटपाच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई